१५-२१ सप्टेंबर
नीतिवचनं ३१
गीत १३५ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. एका आईने दिलेल्या प्रेमळ सल्ल्यातून शिकायला मिळणारे धडे
(१० मि.)
लैंगिक संबंधाबद्दल आणि विवाहाबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन आहे हे तुमच्या मुलांना शिकवा (नीत ३१:३, १०; टेहळणी बुरूज११ ७/१ २७ ¶७-८)
मद्य पिण्याबद्दल यहोवाचा दृष्टिकोन काय आहे ते आपल्या मुलांना शिकवा (नीत ३१:४-६; कुटुंबासाठी मदत-E लेख ४ ¶११-१३)
यहोवा जसं इतरांना मदत करतो तशी मदत करायला तुमच्या मुलांना शिकवा (नीत ३१:८, ९; सावध राहा!१७.३ ९ ¶५)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
नीत ३१:१०-३१—इब्री शास्त्रवचनांतले काही भाग तोंडपाठ करण्यासाठी इस्राएली लोकांना कशामुळे मदत व्हायची? (टेहळणी बुरूज९३ २/१ ४-५ ¶७-८)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) नीत ३१:१०-३१ (शिकवणे अभ्यास १०)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. एखादी व्यक्ती जेव्हा तुमच्याशी किंवा दुसऱ्या कोणाशी तरी आपुकीने बोलते किंवा वागते तेव्हा तिच्यासोबत संभाषण सुरू करा. (शिष्य बनवा धडा ५ मुद्दा ३)
५. संभाषण सुरू करण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. शिष्य बनवा माहितीपत्रकात ‘आणखी माहिती—क’ याखाली “आपल्याला शिकवायला आवडतात अशी सत्यं” असं शीर्षक असलेली माहिती आहे. यात दिलेल्या एखाद्या बायबल सत्याबद्दल सांगा. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ४)
६. पुन्हा भेटण्यासाठी
(५ मि.) घरोघरचं साक्षकार्य. ज्याने आधी २०२५ चं टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती क्र. १ घेतलंय त्याला लवकरच होणाऱ्या खास भाषणाचं आमंत्रण द्या. (शिष्य बनवा धडा ७ मुद्दा ४)
गीत १२१
७. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा काळजीपूर्वक वापर करायला आपल्या मुलांना मदत करा
(८ मि.) चर्चा.
एखाद्या लहान मुलाला मोबाईल किंवा टॅबवर वेगवेगळे ॲप्स सहज वापरताना तुम्ही पाहिलंय का? मुलांना हे किती सहज जमतं हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल! बऱ्याचदा ही उपकरणं वापरायला मुलांना शिकवावंही लागत नाही. पण ती काळजीपूर्वक कशी वापरायची हे मात्र त्यांना शिकवावं लागेल. जर तुम्हालाही मुलं असतील, तर तुम्ही त्यांना ही उपकरणं सांभाळून वापरायला कसं शिकवू शकता?
वेळेचा सर्वात चांगला वापर हा व्हिडिओ दाखवा आणि विचारा:
इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरण्यात आपला किती वेळ जातो याकडे लक्ष देणं का गरजेचं आहे?
आपल्याला आणखी कोणत्या गोष्टींसाठी वेळ काढायची गरज असते?
आपल्या कुटुंबासाठी नियम बनवताना इतर कुटुंबं जे करतात तेच करण्यापेक्षा बायबल तत्त्वांच्या आधारावर नियम बनवा. (गल ६:५) उदाहरणार्थ, यावर विचार करा:
माझं मूल माझं इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरत असेल किंवा त्याला स्वतःचं उपकरण हवं असेल, तर या बाबतीत संयम दाखवायला आणि ते जबाबदारीने वापरायला माझं मूल तयार आहे का?—१कर ९:२५
मी माझ्या मुलाला एकटं असताना इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरायची परवानगी द्यावी का?—नीत १८:१
मी माझ्या मुलाला कोणते ॲप वापरायची आणि वेबसाईट पाहायची परवानगी द्यावी किंवा देऊ नये?—इफि ५:३-५; फिलि ४:८, ९
करमणूक आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठीही पुरेसा वेळ मिळावा म्हणून मी माझ्या मुलाला दररोज किती वेळ इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरू द्यावीत?—उप ३:१
८. मंडळीच्या गरजा
(७ मि.)
९. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ १८-१९