२२-२८ सप्टेंबर
उपदेशक १-२
गीत १०३ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. पुढच्या पिढीला प्रशिक्षण देत राहा
(१० मि.)
[उपदेशक पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
प्रत्येक पिढीची पुढच्या पिढीला प्रशिक्षण द्यायची जबाबदारी आहे (उप १:४; टेहळणी बुरूज१७.०१ २७-२८ ¶३-४)
आपण जेव्हा इतरांना प्रशिक्षण देतो आणि त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवतो, तेव्हा यहोवाच्या सेवेत झटून काम केल्यामुळे मिळणारा आनंद अनुभवण्याची संधी आपण त्यांना देत असतो (उप २:२४)
तुम्हाला जिवापाड आवडणाऱ्या जबाबदाऱ्या इतरांना मिळतील या भीतीने तरुण भावांना प्रशिक्षण द्यायला मागेपुढे पाहू नका
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
उप १:१, तळटीप—शलमोनला “सभा भरवणारा” असं का म्हटलंय ते सांगा (इन्साइट “उपदेशक” ¶१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) उप १:१-१८ (शिकवणे अभ्यास ११)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(२ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. समोरच्या व्यक्तीला कोणत्या विषयात आवड आहे ते जाणून घ्या आणि तिला पुन्हा भेटायची व्यवस्था करा. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ५)
५. संभाषण सुरू करण्यासाठी
(२ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. शिष्य बनवा माहितीपत्रकात ‘आणखी माहिती—क’ याखाली “आपल्याला शिकवायला आवडतात अशी सत्यं” असं शीर्षक असलेली माहिती आहे. यातल्या एखाद्या पद्धतीचा उपयोग करून त्यात दिलेलं एखादं बायबल सत्य शिकवा. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ३)
६. पुन्हा भेटण्यासाठी
(२ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. आधीच्या भेटीत समोरच्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ५)
७. शिष्य बनवण्यासाठी
(५ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. बायबल अभ्यास कसा केला जातो ते दाखवा आणि तो पुढे चालू ठेवायची व्यवस्था करा. (शिष्य बनवा धडा १० मुद्दा ३)
गीत ८४
८. प्रशिक्षण देण्याबद्दल तीन महत्त्वाचे धडे
(१५ मि.) चर्चा.
आपलं जर इतरांवर प्रेम असेल तर यहोवाने आपल्याला दिलेल्या कामाचं आपण आनंदाने इतरांना प्रशिक्षण देऊ
इतरांना प्रशिक्षण कसं द्यायचं याबद्दल बायबलमध्ये बरीच जबरदस्त उदाहरणं आहेत. शमुवेलने शौलला, एलीयाने अलीशाला, येशूने त्याच्या शिष्यांना आणि पौलने तिमथ्यला ज्या प्रकारे प्रशिक्षण दिलं त्यातून आपण बरंच काही शिकू शकतो. पण सगळ्यात चांगला शिक्षक यहोवाच आहे. मग या बाबतीत त्याच्याकडून आपण काय शिकू शकतो?
प्रशिक्षण देण्याच्या बाबतीत यहोवाचं अनुकरण करा (योह ५:२०)—निवडक भाग हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
इतरांना प्रशिक्षण देण्याच्या बाबतीत आपण यहोवाकडून कोणत्या तीन गोष्टी शिकू शकतो?
९. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ २०-२१