वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb25 जुलै पृ. १२-१३
  • १८-२४ ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १८-२४ ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
mwb25 जुलै पृ. १२-१३

१८-२४ ऑगस्ट

नीतिवचनं २७

गीत १०२ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. खऱ्‍या मित्रांमुळे आपल्याला कसा फायदा होतो?

(१० मि.)

खरे मित्र आपल्याला “उघडपणे” सल्ला देतात (नीत २७:५, ६; टेहळणी बुरूज१९.०९ ५ ¶१२)

आपल्याला कशी मदत करायची हे आपल्या नातेवाइकांपेक्षा कदाचित आपल्या खऱ्‍या मित्रांना चांगल्या प्रकारे कळू शकतं (नीत २७:१०; इन्साइट-२ ४९१ ¶३)

खरे मित्र आपल्याला चांगला व्यक्‍ती बनायला मदत करतात (नीत २७:१७; टेहळणी बुरूज२३.०९ १० ¶७)

एक तरुण भाऊ वयस्कर भावाला डॉक्टर सांगत असलेल्या गोष्टी समजून घ्यायला मदत करतोय.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • नीत २७:२१—प्रशंसेमुळे आपली परीक्षा कशी होऊ शकते? (टेहळणी बुरूज०६ १०/१ ६ ¶६)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) नीत २७:१-१७ (शिकवणे अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक ख्रिस्ती नाही. (शिष्य बनवा धडा ६ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. शिकवण्याच्या साधनांमधल्या एखाद्या व्हिडिओबद्दल सांगा आणि त्यावर चर्चा करा. (शिष्य बनवा धडा ८ मुद्दा ३)

६. भाषण

(५ मि.) तरुण लोक विचारतात लेख ७५—विषय: मित्राने मन दुखावलं तर? (शिकवणे अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

गीत १०९

७. ‘दुःखाच्या प्रसंगी भावासारखा’ असलेला मित्र

(१५ मि.) चर्चा.

यहोवाने आपल्याला अशी एक जागतिक संघटना दिली आहे, जिच्यात आपल्याला जीव लावणारे मित्र भेटतात. हे खरं आहे, की मंडळीत आपली बऱ्‍याच जणांशी मैत्री असते, पण त्यांपैकी किती जणांसोबत आपली जवळची मैत्री असते? जेव्हा आपण एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतो, एकमेकांवर भरवसा ठेवतो, भावना बोलून दाखवतो, काही गोष्टी सोबत मिळून करतो आणि एकमेकांना मदत करतो तेव्हा आपण पक्के मित्र बनतो. त्यामुळे मैत्री घट्ट करायला वेळ द्यावा लागतो आणि मेहनत घ्यावी लागते.

नीतिवचनं १७:१७ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • मोठ्या संकटाची सुरुवात होण्याआधी, म्हणजे आत्ता आपण भाऊबहिणींसोबतची मैत्री घट्ट का केली पाहिजे?

२ करिंथकर ६:१२, १३ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • ही वचनं लागू केल्यामुळे आपल्याला मित्र बनवायला कशी मदत होईल?

“ ‘प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते’​—⁠मैत्री घट्ट करायला वेळ लागतो” या व्हिडिओमधलं दृश्‍य. बास्केटबॉल कोर्टच्या बाकावर बसलेले असताना ऑस्टिन बेनला बॉल देतोय.

“प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते”—मैत्री घट्ट करायला वेळ लागतो हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • या व्हिडिओमधून तुम्हाला मैत्रीबद्दल काय शिकायला मिळालं?

तुम्ही नमस्ते म्हणून किंवा स्मितहास्य करून मैत्रीचं छोटंसं रोप लावू शकता. मग, जेव्हा तुम्ही त्या व्यक्‍तीबद्दल काळजी असल्याचं दाखवता, तेव्हा तुम्ही जणू काय त्या रोपाला पाणी घालता. पण ते रोप वाढायला म्हणजे तुमची मैत्री घट्ट व्हायला वेळ लागतो. त्यामुळे धीर धरा. जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा तुमच्या मैत्रीचं झाड कायम बहरत राहील.

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ १०-११

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ११८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा