वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb25 जुलै पृ. ११-१६
  • ११-१७ ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ११-१७ ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
mwb25 जुलै पृ. ११-१६

११-१७ ऑगस्ट

नीतिवचनं २६

गीत ८८ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. ‘मूर्खापासून’ दूर राहा

(१० मि.)

‘मूर्खाला’ सन्मान शोभत नाही (नीत २६:१; इन्साइट-२ ७२९ ¶६)

‘मूर्खाला’ बऱ्‍याचदा कडक शिस्त लावावी लागते (नीत २६:३; टेहळणी बुरूज८७-E १०/१ १९ ¶१२)

‘मूर्ख’ भरवशालायक नसतो (नीत २६:६; इन्साइट-२ १९१ ¶४)


अर्थ: बायबलमध्ये ‘मूर्ख’ हा शब्द अशा व्यक्‍तीसाठी वापरण्यात आलाय, जी समंजसपणे वागत नाही. तसंच, ती योग्य आणि अयोग्य यासाठी असलेल्या देवाच्या स्तरांविरुद्ध वागते.

एका तरुण भावाच्या शाळेतली मुलं त्यांच्या फोनमध्ये काहीतरी बघत असताना तो भाऊ न घाबरता, आत्मविश्‍वासाने तिथून निघून जातो.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • नीत २६:४, ५—ही वचनं एकमेकांपेक्षा अगदी उलट आहेत असं का म्हणता येणार नाही? (इन्साइट-१ ८४६)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) नीत २६:१-२० (शिकवणे अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. एखाद्या पत्रिकेचा वापर करून संभाषण सुरू करा. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. मागच्या भेटीत तुम्ही दिलेल्या पत्रिकेवर चर्चा करा. (शिष्य बनवा धडा ७ मुद्दा ४)

६. शिष्य बनवण्यासाठी

(५ मि.) तुमच्या विद्यार्थ्याला त्याच्या नातेवाइकाला साक्ष देण्यासाठी तयारी करायला मदत करा. (शिष्य बनवा धडा ११ मुद्दा ५)

ख्रिस्ती जीवन

गीत ९४

७. वैयक्‍तिक अभ्यास करून “तारणासाठी सुज्ञ” बना

(१५ मि.) चर्चा.

कोलाज: १. एक बहीण घरात अभ्यास करत आहे. तिच्या कंप्यूटरवर jw.org वरचा साइन लँग्वेजमधला व्हिडिओ सुरू आहे. २. एक भाऊ ब्रेकमध्ये इअरबड्‌स लावून त्याच्या फोनवर अभ्यास करतोय. ३. एक वयस्कर बहीण तिच्या टॅबवर “JW लायब्ररी” वापरत आहे. ४. एक आई आणि तिचा मुलगा मंडळीच्या सभेत “JW लायब्ररी” वापरत आहेत.

तीमथ्यने बालपणापासून शिकलेली पवित्र लिखाणं किती मौल्यवान आहेत, याची प्रेषित पौलने त्याला आठवण करून दिली. या लिखाणांमुळे तीमथ्य “तारणासाठी सुज्ञ” बनणार होता. (२ती ३:१५) बायबलची सत्यं खूप मौल्यवान असल्यामुळे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीने, बायबलचं वाचन करायला आणि त्याचा अभ्यास करायला वेळ काढला पाहिजे. पण आपल्याला अभ्यास करायलाच आवडत नसलं तर?

१ पेत्र २:२ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • बायबल अभ्यासाचा आनंद घ्यायला शिकणं आपल्यासाठी शक्य आहे का?

  • देवाच्या वचनासाठी “तीव्र इच्छा उत्पन्‍न” करायला आपण काय करू शकतो?—टेहळणी बुरूज१८.०३ २९ ¶६

  • संघटनेने पुरवलेल्या इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे, जसं की JW लायब्ररी, वॉचटॉवर ऑनलाईन लायब्ररी यांमुळे आपल्याला बायबलचा आणखी चांगल्या प्रकारे अभ्यास करायला कशी मदत होऊ शकते?

संघटनेची कामगिरी—JW लायब्ररी वापरण्यासाठी उपयुक्‍त माहिती हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • तुम्हाला JW लायब्ररीचा कसा फायदा झालाय?

  • या ॲपचं कोणतं वैशिष्ट्य तुम्हाला आवडतं?

  • तुम्हाला या ॲपचं कोणतं वैशिष्ट्य शिकून घ्यायला आणि ते वापरायला आवडेल?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ८-९

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ८९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा