२५-३१ ऑगस्ट
नीतिवचनं २८
गीत १५० आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. दुष्ट माणसातला आणि नीतिमान माणसातला फरक
(१० मि.)
दुष्ट माणूस भित्रा असतो, पण नीतिमान माणूस धाडसी असतो (नीत २८:१; टेहळणी बुरूज९३-E ५/१५ २६ ¶२)
दुष्ट माणसाला योग्य-अयोग्य समजत नाही, पण नीतिमान माणसाला चांगले निर्णय घेता येतात (नीत २८:५; इन्साइट-२ ११३९ ¶३)
नीतिमान माणूस गरीब असला तरी त्याचं मोल श्रीमंत असलेल्या दुष्ट माणसापेक्षा जास्त असतं (नीत २८:६; इन्साइट-१ १२११ ¶४)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
नीत २८:१४—या वचनात कोणती ताकीद देण्यात आली आहे? (टेहळणी बुरूज०१ १२/१ ११ ¶३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) नीत २८:१-१७ (शिकवणे अभ्यास १०)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. युद्धाचा आणि हिंसेचा अंत होईल यावर चर्चा करा. (शिष्य बनवा धडा ५ मुद्दा ५)
५. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. युद्धाचा आणि हिंसेचा अंत होईल यावर चर्चा करा. (शिष्य बनवा धडा ५ मुद्दा ४)
६. संभाषण सुरू करण्यासाठी
(२ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. युद्धाचा आणि हिंसेचा अंत होईल यावर चर्चा करा. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ४)
७. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. युद्धाचा आणि हिंसेचा अंत होईल यावर चर्चा करा. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ४)
गीत ११२
८. तुम्हाला हिंसेची घृणा वाटते का?
(६ मि.) चर्चा.
दियाबल सैतानाने हिंसेची सुरुवात केली. येशूने सैतानाला “खुनी” म्हटलं. (योह ८:४४) स्वर्गदूत जेव्हा सैतानाच्या बंडात सामील झाले तेव्हा पृथ्वीवर इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा पसरली की पृथ्वी देवाच्या नजरेत भ्रष्ट झाली. (उत्प ६:११) जसजसा सैतानाच्या या हिंसक जगाचा नाश जवळ येतोय, तसतसा बऱ्याच लोकांचा संयम कमी होत चाललाय आणि ते क्रूर होत चाललेत.—२ती ३:१, ३.
स्तोत्र ११:५ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:
हिंसाचाराची आवड असलेल्यांबद्दल यहोवाला कसं वाटतं आणि का?
लोकप्रिय खेळांमधून आणि मनोरंजनांमधून लोकांची हिंसेबद्दलची आवड कशी दिसून येते?
नीतिवचनं २२:२४, २५ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:
आपण जे मनोरंजन निवडतो आणि ज्या लोकांसोबत वेळ घालवतो, त्यांचा हिंसेबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनावर कसा परिणाम होऊ शकतो?
आपण जे मनोरंजन निवडतो त्यावरून हिंसेबद्दलचा आपला दृष्टिकोन कसा दिसून येतो?
९. सप्टेंबर महिन्यात खास मोहीम
(९ मि.)
सेवा पर्यवेक्षकांचं भाषण. मोहिमेबद्दल भाऊबहिणींमध्ये उत्साह निर्माण करा आणि मोहिमेसाठी ज्या स्थानिक योजना करण्यात आल्या आहेत त्यांबद्दल सांगा.
ही शांती! (२०२२ अधिवेशनाचं गीत) हा व्हिडिओ दाखवा.
१०. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ १२-१३