वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 जुलै पृ. १०-१६
  • ५-११ ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ५-११ ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 जुलै पृ. १०-१६

५-११ ऑगस्ट

स्तोत्रं ७०-७२

गीत ५९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. देवाच्या सामर्थ्याबद्दल “पुढच्या पिढीला” सांगा

(१० मि.)

दावीद तरुण होता तेव्हा त्याने यहोवाचं संरक्षण अनुभवलं (स्तो ७१:५; टेहळणी बुरूज९९ ९/१ १८ ¶१७)

दावीदने त्याच्या म्हातारपणातही यहोवाची मदत अनुभवली (स्तो ७१:९; सावध राहा!०४-E १०/८ २३ ¶३)

आपला अनुभव सांगून दावीदने तरुणांना प्रोत्साहन दिलं (स्तो ७१:१७, १८; टेहळणी बुरूज१४ १/१५ २३ ¶४-५)

मागच्या आठवड्यात “कौटुंबिक उपासनेसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी” या भागात दाखवलेल्या कुटुंबाने आता एका वयस्कर जोडप्याला कौटुंबिक उपासनेसाठी बोलवलं आहे. ते जोडपं त्यांना फोटो दाखवून अनुभव सांगत आहे. आणि सगळे जण ते आनंदाने ऐकत आहेत.

स्वतःला विचारा, ‘आमच्या कौटुंबिक उपासनेत, बऱ्‍याच काळापासून यहोवाची सेवा करणाऱ्‍या कोणत्या भावाची किंवा बहिणीची मुलाखत घ्यायला मला आवडेल?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ७२:८​—यहोवाने अब्राहामला उत्पत्ती १५:१८ मध्ये दिलेलं अभिवचन शलमोन राज्याच्या काळात कसं खरं ठरलं? (इन्साइट-१ ७६८)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो ७१:१-२४ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक वाद घालायचा प्रयत्न करतो तेव्हा प्रेमाने आणि शांतीने संभाषण तिथेच थांबवा. (शिष्य बनवा  धडा ४ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. बायबल अभ्यास करायला संकोच वाटत असलेल्या एखाद्या नातेवाईकासोबत आधी चर्चा केलेल्या विषयावरच पुढे चर्चा सुरू ठेवा. (शिष्य बनवा  धडा ८ मुद्दा ४)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) भाषण. सहसा विचारले जाणारे प्रश्‍न  ३२​—विषय: यहोवाचे साक्षीदार जुना करार मानतात का? (शिकवणे  अभ्यास १७)

ख्रिस्ती जीवन

गीत ७६

७. कौटुंबिक उपासनेसाठी काही कल्पना

(१५ मि.) चर्चा.

तेच कुटुंब उभे राहून राज्य गीतांचा सराव करत आहेत.
तेच कुटुंब JW ब्रॉडकास्टिंग कार्यक्रम पाहात आहे.
कौटुंबिक उपासनेत सराव करताना मुलगी तिच्या आईला उत्तर देत आहे.

“यहोवाच्या शिस्तीत आणि शिक्षणात” मुलांना वाढवण्यासाठी कौटुंबिक उपासनेची वेळ खूप महत्त्वाची आहे. (इफि ६:४) शिकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, पण त्याच वेळी त्यातून आनंदसुद्धा अनुभवता येऊ शकतो. खासकरून बायबलची सत्यं समजून घेण्यासाठी मुलांमध्ये आवड निर्माण होत असते तेव्हा. (योह ६:२७; १पेत्र २:२) कौटुंबिक उपासनेतून मुलांना शिकता यावं आणि त्याच वेळी त्याची मजाही घेता यावी अशा प्रकारे कौटुंबिक उपासना घेण्यासाठी पालकांना मदत व्हावी म्हणून “कौटुंबिक उपासनेसाठी काही कल्पना” या चौकटीची थोडक्यात उजळणी करा. आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • यांपैकी कोणते काही पर्याय वापरायला तुम्हाला आवडतील?

  • याशिवाय आणखी कोणत्या गोष्टी फायद्याच्या आहेत असं तुम्हाला वाटतं?

कौटुंबिक उपासनेसाठी काही कल्पना

बायबल:

  • दर आठवड्यासाठी असणाऱ्‍या बायबल वाचनाचा ऑडिओ ऐका किंवा आळीपाळीने मोठ्या आवाजात वाचा. कुटुंबातला प्रत्येक सदस्य बायबल अहवालातल्या वेगवेगळ्या व्यक्‍तीचा भाग वाचतील

  • आठवड्याच्या बायबल वाचनावर प्रश्‍न तयार करा. आणि मग कुटुंबातली प्रत्येक व्यक्‍ती स्वतःसाठी एक प्रश्‍न निवडून त्यावर संशोधन करेल. मग त्यांना जे शिकायला मिळालं ते सगळ्यांना सांगतील

  • एखादा प्रश्‍न किंवा परिस्थिती सांगा आणि त्यावर कोणती बायबल तत्त्वं लागू होतात ते शोधण्यासाठी ख्रिस्ती जीवनासाठी उपयोगी शास्त्रवचनं  यात संशोधन करा

  • बायबलमधल्या एखाद्या भागाचं नाट्यरुपांतर करा

  • लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा  या माहितीपत्रकाच्या ‘आणखी माहीती​—क’ मध्ये दाखवल्याप्रमाणे दर आठवडी वेगवेगळ्या बायबल वचनांचं एक फ्लॅश कार्डa बनवा आणि ते पाठ करायचा प्रयत्न करा. मागच्या आठवड्यात तयार केलेल्या कार्डची उजळणी करा

  • कायम जीवनाचा आनंद घ्या!  या पुस्तकातल्या एका भागाचा अभ्यास करा

  • कुटुंबातल्या लोकांना jw.org वर “बायबलच्या शिकवणी” या टॅबखाली असलेल्या “बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं” या लेखमालिकेतल्या एखाद्या लेखावर माहिती सादर करायला सांगा

सभा:

  • मंडळीच्या सभांमध्ये होणाऱ्‍या एखाद्या भागाची तयारी करा

  • उत्तर तयार करून त्याचा सराव करा. उत्तर देण्यासाठी किती वेळ लागतोय ते पाहा

  • उपासनेच्या गीतांचा सराव करा

  • सभेआधी आणि नंतर एखाद्याला प्रोत्साहन देण्यासाठी काय बोलणार यावर चर्चा करून सराव करा

  • तुम्हाला मिळालेल्या विद्यार्थी भागाचा घरच्यांसमोर सराव करा

प्रचारकार्य:

  • घरोघरच्या साक्षकार्याचा सराव करा

  • पुनर्भेटीची तयारी करा

  • अनौपचारिक साक्ष देण्यासाठी एखाद्या परिस्थितीची कल्पना करा आणि मैत्रिपूर्ण संभाषण कसं सुरू करता येईल याचा सराव करा

  • स्मारकविधीच्या काळात किंवा कामाला किंवा शाळेला सुट्टी असते तेव्हा आपली सेवा वाढवण्यासाठी आपल्याला कोणती काही विशिष्ट ध्येयं ठेवता येतील यावर चर्चा करा

कुटुंबाच्या गरजा:

  • आपली निष्पक्ष भूमिका, शाळा कॉलेजमधल्या मुलांकडून त्रास किंवा चेष्टा, डेटींग किंवा सण साजरा करणं याबाबतीत एखादी विशिष्ट परिस्थिती निर्माण होते किंवा होण्याची शक्यता असते, तेव्हा ती कशी हाताळता येईल याबद्दल सराव करा

  • असं करता येईल की पालक मुलांची भूमिका घेतील आणि मुलं पालकांची. आणि मग मुलं एखाद्या विषयावर संशोधन करून त्यावर पालकांसोबत तर्क करतील

आणखी काही पर्याय:

  • JW ब्रॉडकास्टिंग कार्यक्रम पाहा आणि त्यावर चर्चा करा

  • jw.org वरचा एखादा लेख वाचा किंवा व्हिडिओ पाहा आणि त्यावर चर्चा करा

  • jw.org वर “बायबलच्या शिकवणी” या टॅबखाली असलेल्या “तरुणांसाठी” किंवा “चिमुकल्यांसाठी” या भागात असलेल्या एखाद्या लेखावर किंवा व्हिडिओवर चर्चा करा

  • अधिवेशनात किंवा संमेलनात घेतलेल्या नोट्‌सची उजळणी करा

  • सृष्टीतल्या एखाद्या गोष्टीचं निरीक्षण किंवा संशोधन करा आणि त्यातून यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं यावर चर्चा करा

  • कौटुंबिक उपासनेत कधीकधी एखाद्या भाऊबहिणीला बोलवून त्यांची मुलाखत घ्या

  • आध्यात्मिक ध्येयं ठेवा आणि ती कशी गाठता येतील यावर चर्चा करा

  • सोबत मिळून एखादं मॉडल तयार करा. जसं की, नोहाचं जहाज वगैरे. किंवा एखादा नकाशा किंवा तक्‍ता तयार करा

कौटुंबिक उपासना आणखी चांगली कशी करता येईल?  हा व्हिडिओ दाखवा. आणि विचारा:

  • कुटुंबात मुलं नसली तरी पती आपल्या पत्नीसाठी कौटुंबिक उपासना कशी मनोरंजक बनवू शकतो?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या  अध्या. १३ ¶१७-२४

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १२४ आणि प्रार्थना

a कार्डच्या एका बाजूला वचन असेल (उदा. उत्पत्ती ३:१५) आणि दुसऱ्‍या बाजूला वचनात काय म्हटलंय ते असेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा