वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 मे पृ. १२-१३
  • १७-२३ जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १७-२३ जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 मे पृ. १२-१३

१७-२३ जून

स्तोत्रं ५१-५३

गीत ८९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. गंभीर पापापासून दूर राहण्यासाठी पावलं उचला

(१० मि.)

आपल्याकडून कोणतंच पाप होणार नाही असा विचार करू नका, कारण आपल्या सगळ्यांचाच कल वाईट गोष्टी करण्याकडे असतो (स्तो ५१:५; २कर ११:३)

यहोवासोबतचं तुमचं नातं मजबूत होईल अशा गोष्टी करत राहा (स्तो ५१:६; टेहळणी बुरूज१९.०१ १५ ¶४-५)

अनैतिक विचार आणि इच्छांविरुद्ध लढत राहा (स्तो ५१:१०-१२; टेहळणी बुरूज१५ ६/१५ १४ ¶५-६)

कोलाज: एक तरुण भाऊ नियमितपणे आध्यात्मिक गोष्टी करतोय. १. तो बायबल वाचतोय. २. तो कळकळीने प्रार्थना करतोय. ३. तो सभांमध्ये उत्तर देतोय. ४. तो ट्रॉलीवरचं साक्षकार्य करतोय.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ५२:२-४—या वचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे दवेगने काय केलं? (इन्साइट-१ ६४४)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो ५१:१-१९ (शिकवणे  अभ्यास १२)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(२ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. (शिष्य बनवा  धडा ७ मुद्दा ३)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(२ मि.) घरोघरचं साक्षकार्य. (शिष्य बनवा  धडा ४ मुद्दा ४)

६. पुन्हा भेटण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. देवाचं नाव काय आहे ते सांगा. (शिष्य बनवा  धडा ९ मुद्दा ५)

७. शिष्य बनवण्यासाठी

(४ मि.) कायम आनंद घ्या!  धडा १४ मुद्दा ७ आणि काही जण म्हणतात (शिष्य बनवा  धडा ११ मुद्दा ५)

ख्रिस्ती जीवन

गीत ११५

८. चुका सुधारण्यासाठी पावलं उचला

(१५ मि.) चर्चा.

कोलाज: “माझे किशोरवयातले दिवस—चुका होतात तेव्हा काय करावं?” या व्हिडिओमधली दृश्‍यं १. तलिला २. जोसे.

आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण चुकतोच. (१यो १:८) आपल्या हातून चूक होते तेव्हा आपल्याला कदाचित लोक काय म्हणतील याची चिंता वाटेल किंवा आपल्याला शिक्षा होईल अशी भीती वाटेल. पण, या गोष्टीमुळे आपण यहोवाला क्षमा मागण्यासाठी आणि त्याची मदत घेण्यासाठी मागेपुढे पाहिलं नाही पाहिजे. (१यो १:९) चूक सुधारायचं पहिलं पाऊल म्हणजे यहोवाकडे वळणं.

स्तोत्र ५१:१, २, १७ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • आपल्या हातून गंभीर चूक होते, तेव्हा यहोवाकडे मदत मागण्यासाठी दावीदचे शब्द आपल्याला कसं प्रोत्साहन देतात?

माझे किशोरवयातले दिवस—चुका होतात तेव्हा काय करावं?  हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • कोणत्या गोष्टींमुळे तलिला आणि जोसे यांनी चुका केल्या?

  • त्यांच्या चुका सुधारण्यासाठी त्यांनी कोणती पावलं उचलली?

  • असं केल्यामुळे त्यांना कोणते फायदे झाले?

९. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या  अध्या. ११ ¶५-१०, पान ८९ वरची चौकट

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १२९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा