देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
इतरांचं सांत्वन करताना अलीफजसारखं वागू नका
माणसं देवाला कधीच खूश करू शकत नाहीत असं अलीफजने ईयोबला सांगितलं (ईयो १५:१४-१६; टेहळणी बुरूज०५-HI ९/१५ २६ ¶४-५)
अलीफजने आपल्या बोलण्यातून असं दाखवायचा प्रयत्न केला, की ईयोब दुष्ट असल्यामुळे त्याला संकटांचा सामना करावा लागत आहे (ईयो १५:२०)
अलीफज जे काही बोलला त्यामुळे ईयोबचं सांत्वन झालं नाही (ईयो १६:१, २)
अलीफजने ईयोबला जे काही सांगितलं ते खोटं होतं. कारण आपण यहोवाची सेवा करण्यासाठी जी मेहनत घेतो त्याची तो नेहमी कदर करतो. (स्तो १४९:४) शिवाय, नीतिमान माणसांनाही समस्यांचा सामना करावा लागू शकतो हे आपल्याला माहीत आहे.—स्तो ३४:१९.
यावर मनन करा: आपण “निराश झालेल्यांचं सांत्वन” कसं करू शकतो?—१थेस ५:१४; टेहळणी बुरूज१५ २/१५ ९ ¶१६.