ख्रिस्ती जीवन
‘काही रक्कम बाजूला काढून ठेवा’
आपण मनाला वाटेल तेव्हा दान देण्याऐवजी नियमितपणे दान दिलं पाहिजे. प्रेषित पौलनेसुद्धा आपल्याला “काही रक्कम बाजूला काढून” ठेवण्याचं प्रोत्साहन दिलं. (१कर १६:२) बायबलमध्ये दिलेल्या या सल्ल्याचं पालन केल्यामुळे आपल्याला शुद्ध उपासनेला पाठिंबा द्यायला मदत होते. आणि त्यामुळे आपल्याला आनंदसुद्धा होतो. कधीकधी आपण देत असलेलं दान खूप कमी आहे असं आपल्याला वाटत असेल. पण जेव्हा यहोवा हे पाहतो की त्याचा गौरव करण्यासाठी आपल्याजवळ असलेल्या मौल्यवान गोष्टी द्यायची आपली इच्छा आहे, तेव्हा मनापासून दिलेल्या आपल्या दानाबद्दल त्याला खूप कदर वाटते.—नीत ३:९.
काही रक्कम बाजूला काढून ठेवल्याबद्दल तुमचे आभार! हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
दान देण्यासाठी आधीच काही रक्कम बाजूला काढून ठेवण्यासाठी योजना केल्यामुळे कसा फायदा होतो?
“काही रक्कम बाजूला काढून” ठेवण्यासाठी काही जणांनी काय केलं आहे?