वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 सप्टेंबर पृ. ११
  • यहोवा मनाने खचलेल्यांना वाचवतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा मनाने खचलेल्यांना वाचवतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • यहोवा “दुःखी मनाच्या लोकांना बरं करतो”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • निराशेवर मात करणं शक्य आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • “देवाच्या जवळ जाणं” हेच आपल्या हिताचं आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 सप्टेंबर पृ. ११

ख्रिस्ती जीवन

यहोवा मनाने खचलेल्यांना वाचवतो

आपल्या प्रत्येकालाच कधी ना कधी निराश वाटतं. पण, आपण निराश आहोत याचा अर्थ आपला विश्‍वास कमजोर झाला आहे असं नाही. काही प्रसंगी तर यहोवालासुद्धा वाईट वाटलं आहे असं आपण बायबलमध्ये वाचतो. (उत्प ६:५, ६) पण आपल्याला सारखं सारखं किंवा नेहमीच निराश झाल्यासारखं वाटत असेल तर काय?

प्रार्थनेत यहोवाकडे मदत मागा. यहोवाला आपल्या भावनांची आणि आपल्या मानसिक आरोग्याची काळजी आहे. आपल्याला कधी आनंद होतो आणि कधी दुःख होतं हे त्याला माहीत असतं. आणि आपल्याला तसं का वाटतं हेसुद्धा तो समजू शकतो. (स्तो ७:९ख) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आपण जेव्हा दुःखी असतो किंवा नैराश्‍याचा सामना करत असतो, तेव्हासुद्धा यहोवा आपली काळजी करतो आणि तो आपल्याला मदत करू शकतो.—स्तो ३४:१८.

आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या. आपल्या मनात नकारात्मक भावना असतात तेव्हा आपण आनंदी नसतो. शिवाय, यहोवाच्या उपासनेवरही त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून आपण आपल्या हृदयाचं म्हणजेच आपल्या व्यक्‍तिमत्त्वाचं रक्षण केलं पाहिजे.—नीत ४:२३.

आपले भाऊबहीण शांतीने कसे राहत आहेत—आजारी असतानाही  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • नैराश्‍याच्या समस्येवर मात करायला निक्कीने कोणती काही व्यावहारिक पावलं उचलली?

  • आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे असं निक्कीला का वाटलं?—मत्त ९:१२

  • यहोवा आपल्याला मदत करेल असा भरवसा निक्कीला होता हे तिने कोणकोणत्या मार्गांनी दाखवलं?

“टेहळणी बुरूज” क्र. १ २०२३, विषय “मनाचं आरोग्यही जपायला हवं!”

तुमच्या ओळखीचं असं कोणी आहे का ज्याला टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती क्र. १ २०२३ या अंकामुळे फायदा होईल?

आपल्या भावनिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोणती काही व्यावहारिक पावलं उचलू शकता?

(खाली दिलेल्या ज्या गोष्टींवर तुम्हाला आणखी काम करावंसं वाटतं त्यापुढे दिलेल्या रकान्यात खूण करा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा