वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 जुलै पृ. १५
  • यहोवासारखं एकनिष्ठ प्रेम दाखवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवासारखं एकनिष्ठ प्रेम दाखवा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाचा तुम्हाला कसा फायदा होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • एकनिष्ठ प्रेम दाखवल्यामुळे यहोवाला आनंद होतो—तुम्हालाही होतो का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • देवाचं प्रेम सर्वकाळ टिकून राहतं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • आपलं यहोवावर प्रेम आहे हे आपण कसं दाखवू शकतो?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 जुलै पृ. १५

ख्रिस्ती जीवन

यहोवासारखं एकनिष्ठ प्रेम दाखवा

एकनिष्ठ प्रेम दाखवण्याच्या बाबतीत यहोवापेक्षा चांगलं उदाहरण कोणाचंच नाही. (स्तो १०३:११) हे प्रेम काही क्षणांचं किंवा आज आहे उद्या नाही असं नाही; तर ते शेवटपर्यंत साथ देणारं गाढ प्रेम आहे. असं प्रेम यहोवाने बऱ्‍याच मार्गांनी इस्राएली लोकांना दाखवलं. त्याने त्यांना इजिप्तच्या गुलामीतून सोडवलं आणि वचन दिलेल्या देशात आणलं. (स्तो १०५:४२-४४) तो त्यांच्या बाजूने लढला आणि ते बऱ्‍याचदा चुकले तरी तो त्यांना माफ करत राहिला. (स्तो १०७:१९, २०) ‘यहोवाने एकनिष्ठ प्रेमाने केलेल्या कार्यांवर’ आपण मनन केलं तर त्याच्यासारखं एकनिष्ठ प्रेम दाखवायची प्रेरणा आपल्याला मिळेल.—स्तो १०७:४३.

कोलाज: “यहोवाचं एकनिष्ठ प्रेम दाखवणाऱ्‍या कार्यांवर मनन करा” या व्हिडिओवर आधारित एक उदाहरण. १. बंधू कॅपरा एका बांधवासोबत एका बहिणीच्या घरी तिला भेटायला गेले आहेत. २. बंधू कॅपरा आणि इतर बांधव तुरुंगात आहेत. बंधू आजारी असलेल्या एका माणसाला काही खायला देत आहेत.

“यहोवाचं एकनिष्ठ प्रेम दाखवणाऱ्‍या कार्यांवर मनन करा”  हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • आपण कोणकोणत्या मार्गांनी एकनिष्ठ प्रेम दाखवू शकतो?

  • एकनिष्ठ प्रेम दाखवण्यासाठी त्याग करणं का गरजेचं आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा