ख्रिस्ती जीवन
नवीन सेवा वर्षासाठी तुम्ही कोणती ध्येयं ठेवली आहेत?
आपल्या प्रत्येकालाच यहोवाची आणखी चांगल्या प्रकारे सेवा करायची आणि त्याचं मन आनंदित करायची इच्छा आहे. त्यासाठी आपण जे काही करायचं ठरवतो आणि त्यासाठी जी काही मेहनत घेतो त्यालाच आपण आध्यात्मिक ध्येय म्हणू शकतो. ही ध्येयं आपल्याला सत्यात प्रगती करायला मदत करतात. आणि ती गाठण्यासाठी आपण खर्च केलेला वेळ आणि शक्ती कधीच वाया जात नाही. (१ती ४:१५) पण आपण वेळोवेळी आपली ध्येयं तपासून का पाहिली पाहिजेत? कारण परिस्थिती बदलत राहाते. आणि त्यामुळे आधी ठेवलेली ध्येयं गाठणं आता कदाचित शक्य नसेल. किंवा मग, आपण ती गाठली असतील आणि आता नवीन ध्येयं ठेवायची गरज असेल.
सहसा नवीन सेवा वर्ष सुरू होण्याआधी आपली ध्येयं तपासून पाहणं चांगलं आहे. मग आपल्या कौटुंबिक उपासनेत चर्चा करून, स्वतःसाठी आणि कुटुंब मिळून साध्य करता येतील अशी ध्येयं ठेवायला काय हरकत आहे?
पुढे सांगितलेल्या गोष्टींच्या बाबतीत तुम्ही कोणती विशिष्ट ध्येयं ठेवली आहेत, आणि तुम्ही ती कशी साध्य कराल?
बायबल वाचन, व्यक्तिगत अभ्यास, सभांना जाणं, उत्तरं देणं.—टेहळणी बुरूज०२ ६/१५ १४-१५ ¶१४-१५
क्षेत्र सेवा.—टेहळणी बुरूज२३.०५ २७ ¶४-५
ख्रिस्ती गुण—टेहळणी बुरूज२२.०४ २३ ¶५-६
इतर: