वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मार्च पृ. १३
  • सर्व समस्या एक दिवस नक्कीच संपतील

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्व समस्या एक दिवस नक्कीच संपतील
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • परीक्षांचा सामना करत असताना यहोवा आपल्याला मदत करतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • धीर दाखवत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • धीर धरा आणि यहोवावर भरवसा ठेवा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • तुम्ही धीराने वाट पाहण्यास तयार आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मार्च पृ. १३
चित्रं: “विभागलेल्या जगात ऐक्याने राहणारे लोक” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. १. एका संमेलनात फक्‍त काळ्या वर्णाचे भाऊबहीण आहेत. २. काळ्या आणि गोऱ्‍या वर्णाचे वडील आणि त्यांच्या पत्नींनी सोबत मिळून काढलेला फोटो. ३. वेगवेगळ्या वयाच्या आणि वर्णाच्या दोन बहिणी सार्वजनिक सेवाकार्य करत आहे.

ख्रिस्ती जीवन

सर्व समस्या एक दिवस नक्कीच संपतील

समस्या जेव्हा बऱ्‍याच काळापर्यंत राहतात तेव्हा आपण खूप जास्त निराश होऊ शकतो. दावीदला माहित होतं की शौल राजामुळे त्याच्यावर आलेली संकटं एक न्‌ एक दिवस नक्की संपतील. आणि यहोवाने वचन दिल्याप्रमाणे तो राजा बनेल. (१शमु १६:१३) दावीदला विश्‍वास होता की यहोवा त्याची परिस्थिती बदलेल आणि म्हणून त्याने धीर धरला.

जेव्हा आपण समस्येत असतो तेव्हा समजबुद्धीचा आणि विचारशक्‍तीचा वापर करून आपण परिस्थिती कदाचित बदलू शकतो. (१शमु २१:१२-१४; नीत १:४) पण कधीकधी बायबल तत्त्वांप्रमाणे समस्या सोडवायचा प्रयत्न करूनही त्या तशाच राहतात. अशा वेळेस आपण धीर धरला पाहिजे आणि यहोवावर भरवसा ठेवला पाहिजे. लवकरच यहोवा या सर्व समस्या काढून टाकेल आणि आपल्या “डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल.” (प्रक २१:४) आपल्या काही समस्या आज यहोवाच्या मदतीमुळे किंवा इतर कारणांमुळे निघून जाऊ शकतात. पण एका गोष्टीची आपल्याला पूर्ण खातरी आहे. ती म्हणजे, सर्व समस्या एक दिवस नक्कीच संपतील. यामुळे आपल्याला खूप दिलासा मिळतो.

विभागलेल्या जगात ऐक्याने राहणारे लोक  हा व्हिडिओ पाहा आणि मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • दक्षिण अमेरिकेतल्या काही भाऊबहिणींना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला?

  • त्यांनी कशा प्रकारे धीर धरला आणि प्रेम दाखवलं?

  • “जास्त महत्त्वाच्या” गोष्टी करण्यासाठी त्यांना कशामुळे मदत झाली?—फिलि १:१०

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा