वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मार्च पृ. ५
  • यहोवावर भरवसा ठेवण्याचे तीन मार्ग

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवावर भरवसा ठेवण्याचे तीन मार्ग
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • देवाला प्रार्थना करण्याचा बहुमान
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • देवाशी नातं मजबूत करण्यासाठी प्रार्थना करा
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • तुम्ही कशा प्रकारे व्यक्‍तिगत निर्णय घेता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • देवाचा सन्मान होईल असे निर्णय घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मार्च पृ. ५

ख्रिस्ती जीवन

यहोवावर भरवसा ठेवण्याचे तीन मार्ग

दावीदचा यहोवावर भरवसा असल्यामुळे तो गल्याथला हरवू शकला. (१शमु १७:४५) यहोवा आपल्या सेवकांना मदत करण्यासाठी त्याच्या शक्‍तीचा वापर करायला नेहमी तयार असतो. (२इत १६:९) आपण स्वतःच्या अनुभवांवर आणि क्षमतांवर भरवसा ठेवण्याऐवजी यहोवा देत असलेल्या मदतीवर कसा भरवसा ठेवू शकतो? यासाठी पुढे तीन मार्ग दिले आहेत:

  • नेहमी प्रार्थना करा. चूक होते फक्‍त तेव्हाच यहोवाकडे क्षमेसाठी प्रार्थना करू नका. तर तुम्हाला जेव्हा एखादी वाईट गोष्ट करण्याचा मोह होतो तेव्हासुद्धा तिचा सामना करण्यासाठी यहोवाकडे मदत मागा. (मत्त ६:१२, १३) कधीकधी आपण आधी निर्णय घेतो आणि मग त्यावर यहोवाकडे आशीर्वाद मागतो. पण निर्णय घेण्याआधीसुद्धा  बुद्धी आणि मार्गदर्शनासाठी यहोवाकडे प्रार्थना करा.—याक १:५

  • बायबल वाचनाची आणि अभ्यासाची सवय लावा. दररोज बायबल वाचा. (स्तो १:२) बायबलच्या उदाहरणांवर मनन करण्यासाठी वेळ काढा आणि शिकलेल्या गोष्टी लागू करा. (याक १:२३-२५) सेवाकार्यासाठी स्वतःच्या अनुभवांवर अवलंबून न राहता त्यासाठी चांगली तयारी करा. तसंच, मंडळीच्या सभांमधून पूर्णपणे फायदा घेण्यासाठी आधीच तयारी करा

  • यहोवाच्या संघटनेच्या आधीन राहा. यहोवाच्या संघटनेकडून मिळणारं नवीन मार्गदर्शन काय आहे याची माहिती ठेवा आणि त्याचं लगेच पालन करा. (गण ९:१७) तसंच, मंडळीतल्या वडिलांकडून मिळणाऱ्‍या सल्ल्यांचं आणि सूचनांचंही पालन करा.—इब्री १३:१७

पोलीस एका भावाला अटक करून घेऊन जाताना पत्रकार आणि दुसरे भाऊबहीण ते पाहत आहेत.

छळ झाला तरी घाबरण्याची गरज नाही  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

• भाऊबहिणींना कोणत्या गोष्टींची भीती वाटत होती?

• त्यांना ज्या गोष्टींची भीती वाटत होती त्यांवर मात करायला त्यांना कशामुळे मदत झाली?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा