वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जानेवारी पृ. १६
  • आपल्या बायबल विद्यार्थ्याला वाईट संगतीपासून दूर राहायला मदत करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या बायबल विद्यार्थ्याला वाईट संगतीपासून दूर राहायला मदत करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • वाईट सवयी सोडायला तुमच्या विद्यार्थ्याला मदत करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • यहोवासोबत जवळचं नातं जोडायला तुमच्या बायबल विद्यार्थ्याला मदत करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • तुमच्या बायबल विद्यार्थ्याला सभांना उपस्थित राहायला मदत करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • यहोवाला मदतीसाठी प्रार्थना करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जानेवारी पृ. १६

सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा

आपल्या बायबल विद्यार्थ्याला वाईट संगतीपासून दूर राहायला मदत करा

यहोवासोबत मैत्री करण्यासाठी बायबल विद्यार्थ्याला चांगल्या लोकांची संगत धरावी लागेल. (स्तो १५:१, ४) चांगल्या संगतीमुळे त्याला योग्य ते करायला मदत होईल.—नीत १३:२०; कायम आनंद घ्या!  धडा ४८.

तुमच्या बायबल विद्यार्थ्याला वाईट संगत सोडायला मदत करा. पण असं करत असताना त्यांच्या भावना समजून घ्या. जगातले मित्र सोडणं त्यांच्यासाठी सोपं नाही. म्हणून बायबल अभ्यासापुरताच नाही, तर इतर वेळीसुद्धा त्यांच्यासोबत वेळ घालवा. जसं, की त्यांना मेसेज किंवा फोन करा किंवा त्यांना सहज भेटायला जा. तुमचा बायबल विद्यार्थी प्रगती करत असेल, तर तुम्ही आपल्या भाऊबहिणींसोबत जेव्हा मोकळा वेळ घालवता तेव्हा त्यात त्यालाही सामील करा. त्यामुळे तो पाहू शकेल, की त्याने जगातले मित्र जरी सोडले असले, तरी यहोवाच्या संघटनेमध्ये त्याला बरेच नवीन मित्र मिळाले आहेत. (मार्क १०:२९, ३०) आणि तुम्हालाही हे पाहून आनंद होईल की दिवसेंदिवस यहोवाच्या कुटुंबात वाढ होत आहे.

तुमच्या बायबल विद्यार्थ्याला वाईट संगतीपासून दूर राहायला मदत करा,  हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा:

  • वाईट संगतीचा काय परिणाम होतो?—१कर १५:३३

  • साक्षीदार एकमेकांसोबत मोकळा वेळ कसा घालवतात याबद्दल जेडने काय विचार केला?

  • जेडला जगातले मित्र सोडून भाऊबहिणींसोबत मैत्री करायला निताने कशी मदत केली?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा