ख्रिस्ती जीवन
शमुवेलच्या उदाहरणातून आपण काय शिकतो?
शमुवेल आयुष्यभर यहोवाला विश्वासू राहिला. शमुवेल लहान होता तेव्हा एलीची मुलं हफनी आणि फिनहास ही खूप वाईट काम करायची. पण तरीही शमुवेल त्यांच्यासारखा वागला नाही. (१शमु २:२२-२६) पुढे शमुवेल मोठा होत गेला आणि यहोवा त्याच्यासोबत होता. (१शमु ३:१९) तो वयस्कर झाल्यावरही यहोवाची विश्वासूपणे सेवा करत राहिला, पण त्याची मुलं मात्र यहोवाला विश्वासू राहिली नाहीत.—१शमु ८:१-५.
शमुवेलच्या उदाहरणातून तुम्ही काय शिकू शकता? लहान मुलांनो, भरवसा ठेवा की तुम्हाला कोणत्या समस्या आहेत आणि तुम्हाला काय वाटतं, हे यहोवाला चांगलं माहित आहे. आणि तो तुम्हाला धैर्यवान बनायलाही मदत करेल. (यश ४१:१०, १३) आईवडिलांनो, तुमच्या मुलांनी यहोवाची सेवा करायची सोडून दिली असेल तर निराश होऊ नका. शमुवेलचं उदाहरण लक्षात ठेवा. त्याने आपल्या मुलांना यहोवाला विश्वासू राहायची जबरदस्ती केली नाही. आणि त्यांच्यामुळे यहोवासोबतचं आपलं नातं त्याने कमजोर होऊ दिलं नाही. उलट त्याने सगळ्या गोष्टी यहोवावर सोडून दिल्या आणि तो त्याचं मन आनंदित करत राहिला. आईवडिलांनो, तुम्ही जर यहोवाला विश्वासू राहिलात, तर तुमच्या चांगल्या उदाहरणामुळे तुमची मुलं कदाचित यहोवाकडे परत येतील.
त्यांच्या उदाहरणातून शिका—शमुवेल, हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेले प्रश्न विचारा:
लहान असताना शमुवेलने धैर्य कसं दाखवलं?
डॅनीने धैर्य कसं दाखवलं?
शमुवेलने वयस्कर झाल्यावरसुद्धा चांगलं उदाहरण कसं मांडलं?
योग्य ते करण्याचा ज्यांचा निश्चय पक्का असतो, त्यांना यहोवा मदत करतो
डॅनीच्या मम्मी-पप्पांनी कसं एक चांगलं उदाहरण मांडलं?