वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जानेवारी पृ. ११
  • मुलांनो, आपल्या मम्मी-पप्पांशी मनमोकळेपणे बोला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मुलांनो, आपल्या मम्मी-पप्पांशी मनमोकळेपणे बोला
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • “आपल्या वडिलांचा व आईचा आदर कर”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • तुमच्या कुटुंबातला आनंद टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • आईवडिलांनो आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला मदत करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • आपल्या मुलांना शिकवताना बायबल तत्त्वांचा वापर करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जानेवारी पृ. ११

ख्रिस्ती जीवन

मुलांनो, आपल्या मम्मी-पप्पांशी मनमोकळेपणे बोला

मुलांनो, तुम्ही आपल्या मम्मी-पप्पांना मनातल्या गोष्टी का सांगितल्या पाहिजे? (नीत २३:२६) कारण यहोवाने त्यांना तुमची काळजी घ्यायची आणि तुम्हाला मार्गदर्शन द्यायची जबाबदारी दिली आहे. (स्तो १२७:३, ४) पण जर तुम्ही तुमच्या चिंता आणि मनातल्या भावना त्यांना सांगितल्या नाहीत तर त्यांना तुम्हाला मदत करता येणार नाही. तसंच, ते अनुभवातून जे शिकलेत ते तुम्हाला कळणार नाही. सगळ्या गोष्टी मम्मी-पप्पांना सांगणं गरजेचं आहे का? नेहमीच गरजेच नाही. पण काही गोष्टी त्यांच्यापासून लपवून त्यांना फसवणं नक्कीच चुकीचं आहे.—नीत ३:३२.

आपल्या मम्मी-पप्पांशी बोलण्यासाठी तुम्ही काय करू शकता? नीट बोलता येईल अशी वेळ निवडा. जर असं करणं शक्य नसेल, तर तुम्ही पत्रातून आपल्या भावना त्यांना सांगू शकता. समजा तुमच्या मम्मी-पप्पांना तुमच्याशी अशा विषयावर बोलायचं आहे ज्यावर तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं नाही, तर काय? हे लक्षात ठेवा, की तुमच्या मम्मी-पप्पांना खरंच तुम्हाला मदत करायची आहे! तुमचे मम्मी-पप्पा तुमचे शत्रू नाही, तर मित्र आहेत. आपल्या मम्मी-पप्पांशी बोलण्यासाठी तुम्ही आता जी मेहनत घ्याल त्याचा तुम्हाला कायमचा फायदा होईल.—नीत ४:१०-१२.

माझे किशोरवयातले दिवस—मी मम्मी-पप्पांसोबत कसं बोलू शकतो?  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेले प्रश्‍न विचारा:

  • “माझे किशोरवयातले दिवस—मी मम्मी-पप्पांसोबत कसं बोलू शकतो?” या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, की किशोरवयीन मुलगी ईयरफोन घालून कंप्युटरवर काही ऐकत आहे आणि आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आहे.

    एस्तेर आणि पारतिक यांना कोणत्या गोष्टीची जाणीव झाली?

  • “माझे किशोरवयातले दिवस—मी मम्मी-पप्पांसोबत कसं बोलू शकतो?” या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, की किशोरवयीन मुलगी आपल्या आईसोबत बोलत आहे आणि तिला फोनवर काहीतरी दाखवत आहे.

    येशूच्या उदाहरणातून तुम्ही काय शिकू शकता?

  • “माझे किशोरवयातले दिवस—मी मम्मी-पप्पांसोबत कसं बोलू शकतो?” या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, की एक आई आपल्या घरातल्या कामातून वेळ काढते आणि आपल्या लहान मुलासोबत खेळते.

    तुमच्या मम्मी-पप्पांनी तुमच्यासाठी काय-काय केलंय?

  • “माझे किशोरवयातले दिवस—मी मम्मी-पप्पांसोबत कसं बोलू शकतो?” या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, की एका खेळाचे कोच आपल्या टिमसाठी एका छोट्या बोर्डवर आकृती काढत आहेत.

    तुम्ही यशस्वी व्हावं असं तुमच्या मम्मी-पप्पांना वाटतं

    मम्मी-पप्पांशी बोलण्यासाठी बायबलची कोणती तत्त्वं तुम्हाला मदत करतील?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा