वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जानेवारी पृ. ७
  • यहोवाचं तुमच्यावर एकनिष्ठ प्रेम आहे याची खातरी असू द्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचं तुमच्यावर एकनिष्ठ प्रेम आहे याची खातरी असू द्या
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाचा तुम्हाला कसा फायदा होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • का येताहेत इतक्या नैसर्गिक विपत्ती?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • देवाच्या संघटनेचे भाग राहून सुरक्षिततेत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • यहोवासारखं एकनिष्ठ प्रेम दाखवा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जानेवारी पृ. ७
राज्य सभागृहाबाहेर काही भाऊबहीण खाण्यापिण्याचं सामान घेऊन उभे आहेत.

ख्रिस्ती जीवन

यहोवाचं तुमच्यावर एकनिष्ठ प्रेम आहे याची खातरी असू द्या

तुम्ही यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहात. (यश ४३:४) म्हणून त्याने तुम्हाला त्याच्याशी मैत्री करायची आणि त्याच्या संघटनेचा भाग बनायची संधी दिली. तुम्ही समर्पण केलं आणि बाप्तिस्मा घेतला, त्यानंतर तुम्ही त्याचे झालात. त्यामुळे तो तुमची नक्की काळजी घेईल; खासकरून तुम्ही संकटात असता तेव्हा. यहोवा आपल्या संघटनेद्वारे तुमची काळजी घेईल आणि तुमच्यावर एकनिष्ठ प्रेम करेल.—स्तो २५:१०.

यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल आपण कदर कशी वाढवू शकतो? असं करण्याचा एक मार्ग म्हणजे, अलीकडच्या काळात यहोवाने आपल्या संघटनेद्वारे विपत्ती आलेल्या भागात कशी मदत पुरवली त्याबद्दल माहिती घेणं.

२०१९ संयोजक समिती अहवाल  हा व्हिडिओ पाहा, आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • “२०१९ संयोजक समिती अहवाल” या व्हिडिओमधलं एक दृश्‍य. विपत्ती मदतकार्य समितीचे भाऊबहीण नैसर्गिक विपत्तीचा सामना केलेल्या भाऊबहिणींसोबत चर्चा करत आहेत.

    विपत्ती आल्यावर काय करावं याबाबतीत संयोजक समितीने शाखा कार्यालयांना कशी मदत केली आहे?

  • “२०१९ संयोजक समिती अहवाल” या व्हिडिओमधलं एक दृश्‍य. बांधवांनी इंडोनेशियात नैसर्गिक विपत्तीमुळे नुकसान झालेली घरं पुन्हा बांधली.

    इंडोनेशिया आणि नायजेरियामध्ये विपत्ती आल्यावर यहोवाच्या संघटनेने काय मार्गदर्शन दिलं आणि कशी मदत पुरवली?

  • “२०१९ संयोजक समिती अहवाल” या व्हिडिओमधलं एक दृश्‍य. आफ्रिकेतली एक नर्स स्टेथोस्कोपचा उपयोग करून एका रूग्णाला तपासत आहे.

    कोविड-१९ महामारीच्या काळात संघटनेने जी मदत आणि मार्गदर्शन पुरवलं त्यापैकी कोणती गोष्ट तुम्हाला आवडली?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा