ख्रिस्ती जीवन
कायम जीवनाचा आनंद घ्या! या नवीन साधनाचा सेवाकार्यात वापर करा
बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी आता आपण एका नवीन माहितीपत्रकाचा आणि पुस्तकाचा वापर करणार आहोत, हे कळल्यावर सगळ्यांनाच किती आनंद झाला होता! या नवीन साधनांचा वापर करून जास्तीत जास्त लोकांना शिष्य बनवता यावं म्हणून यहोवाने आशीर्वाद द्यावा हीच आपली प्रार्थना आहे. (मत्त २८:१८-२०; १कर ३:६-९) या नवीन साधनांचा आपण कशा प्रकारे वापर करू शकतो?
कायम जीवनाचा आनंद घ्या! या माहितीपत्रकात शिकवण्याची एक नवीन पद्धत वापरण्यात आली आहे. तेव्हा बायबल अभ्यास चालवण्यासाठी आणि त्याची तयारी करण्यासाठी पुढील सूचनांचं पालन करा.a
दिलेला भाग वाचा आणि प्रश्नांचा वापर करून चर्चा करा
“वाचा” असं लिहिलेली शास्त्रवचनं वाचा, आणि ती कशी लागू होतात हे समजून घेण्यासाठी विद्यार्थ्याला मदत करा
व्हिडिओ दाखवा आणि त्यावर काही प्रश्नं दिले असतील, तर त्यांचा वापर करून चर्चा करा
एका बैठकीत एक धडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा
घरमालकाला खरंच आवड आहे का, ते जाणून घेण्यासाठी आधी माहितीपत्रक द्या. (“पहिल्या भेटीत कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक कसं देता येईल” ही चौकट पाहा.) जर तुम्ही घरमालकासोबत माहितीपत्रकातून अभ्यास करायचं संपवलं असेल, आणि पुढे त्याला आणखी अभ्यास करायचा असेल, तर त्याला पुस्तक द्या आणि चौथ्या धड्यापासून सुरवात करा. जर तुम्ही बायबलमधून शिकायला मिळतं, देवाच्या प्रेमात टिकून राहा किंवा बायबल अभ्यासाच्या इतर कोणत्याही साहित्यातून विद्यार्थ्यासोबत अभ्यास करत असाल, तर त्याऐवजी आता कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातून सुरवात करा. आणि अभ्यास कोणत्या धड्यापासून सुरू करायचा ते ठरवा.
चला, बायबलमधून शिकू या! हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा:
या नवीन पुस्तकातून विद्यार्थ्याला काय शिकायला मिळेल?
विद्यार्थ्याला सुरवातीला हा व्हिडिओ दाखवणं का गरजेचं आहे?
अभ्यास करत असताना, तुम्ही विद्यार्थ्यासमोर टप्प्या-टप्प्याने कोणती ध्येयं ठेवू शकता?—“प्रत्येक भागासाठी असलेला सर्वसाधारण विषय आणि विद्यार्थ्यासाठी ध्येयं” हा तक्ता पाहा.
a टिप: अभ्यास घेताना “हेसुद्धा पाहा” या भागावर चर्चा करणं जरी आवश्यक नसलं, तरी तयारी करताना हा भाग वाचा किंवा त्यात दिलेले व्हिडिओ नक्की पाहा. त्यामुळे विद्यार्थ्याला यातला खासकरून कोणता भाग आवडेल हे तुम्हाला समजेल आणि त्याला मदत करता येईल. या माहितीपत्रकाच्या इलेक्ट्रॉनिक आवृत्तीत अधिक माहितीसाठी आणि व्हिडिओसाठी लिंक दिल्या आहेत.
प्रत्येक भागासाठी असलेला सर्वसाधारण विषय आणि विद्यार्थ्यासाठी ध्येयं |
|||
|---|---|---|---|
धडे |
सर्वसाधारण विषय |
विद्यार्थ्यासाठी ध्येयं |
|
०१-१२ |
बायबल तुम्हाला कशी मदत करू शकतं आणि तुम्ही त्याच्या लेखकाला कसं जाणून घेऊ शकता? |
विद्यार्थ्याला बायबल वाचण्यासाठी, अभ्यासाची तयारी करण्यासाठी आणि सभांना येण्यासाठी प्रोत्साहन द्या |
|
१३-३३ |
देवाने आपल्यासाठी काय केलंय आणि त्याला कशा प्रकारची उपासना आवडते? |
विद्यार्थ्याला इतरांना सत्याबद्दल सांगण्यासाठी आणि प्रचारक बनण्यासाठी उत्तेजन द्या |
|
३४-४७ |
देव त्याच्या उपासकांपासून काय अपेक्षा करतो? |
विद्यार्थ्याला आपलं जीवन यहोवाला समर्पित करायचं आणि बाप्तिस्मा घ्यायचं उत्तेजन द्या |
|
४८-६० |
आपण देवाच्या प्रेमात कसं टिकून राहू शकतो? |
विद्यार्थ्याला योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखायला आणि आध्यात्मिक प्रगती करायला मदत करा |
|