ख्रिस्ती जीवन
“कधीही चिंता करू नका”
प्राचीन इस्राएलमधल्या गरीब लोकांना यहोवाने मदत केली. आजही यहोवा त्याच्या लोकांमध्ये जे गरीब आहेत, त्यांना वेगवेगळ्या मार्गांनी कशी मदत करतो?
त्याने पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगायला त्यांना शिकवलं आहे.—लूक १२:१५; १ती ६:६-८
त्याने त्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवलं आहे.—ईयोब ३४:१९
त्याने त्यांना कष्ट करायला आणि वाईट सवयींपासून दूर राहायला शिकवलं आहे.—नीत १४:२३; २०:१; २कर ७:१
त्याने त्यांना ख्रिस्ती भाऊ-बहिणींचं एक प्रेमळ कुटुंब दिलं आहे.—योह १३:३५; १यो ३:१७, १८
त्याने त्यांना आशा दिली आहे.—स्तो ९:१८; यश ६५:२१-२३
आपली परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्याला चिंता करायची गरज नाही. (यश ३०:१५) आपण यहोवाच्या राज्याला पहिलं स्थान देत राहिलो, तर तो आपल्या सगळ्या गरजा नक्की पूर्ण करेल याची खात्री आपण बाळगू शकतो.—मत्त ६:३१-३३.
‘प्रेम कधीही नाहीसे होत नाही . . . गरीबीतही—काँगो’ हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
अधिवेशनाला लांबून येणाऱ्या बांधवांना आपल्या घरी ठेवता यावं म्हणून काही बांधवांनी काय केलं?
या व्हिडिओतून यहोवाचं त्याच्या गरीब सेवकांवर असलेलं प्रेम कसं दिसून येतं?
आपली परिस्थिती बेताची असली तरी आपण उदारता दाखवण्याच्या बाबतीत यहोवाचं अनुकरण कसं करू शकतो?