१९-२५ जुलै
अनुवाद १६-१८
गीत ३५ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“नीतीने न्याय करण्यासाठी लागणारी काही तत्त्वं”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
अनु १७:७—दोषी व्यक्तीला ठार मारण्यासाठी, त्याच्याविरूद्ध साक्ष दिलेल्या व्यक्तीनेच सर्वात आधी दगडमार करावा, अशी आज्ञा नियमशास्त्रात का दिली होती? (इन्साइट-१ ७८७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) अनु १६:९-२२ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालक ज्या विषयाबद्दल बोलत आहे, त्याच्याशी संबंधित असलेलं एखादं मासिक त्याला द्या. (शिकवणे अभ्यास ३)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. शिकवण्याच्या साधनांमधून एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास ४)
भाषण: (५ मि.) इन्साइट-१ ५१९ ¶४; टेहळणी बुरूज१७.११ १७ ¶१६-१८—विषय: ख्रिस्ती मंडळीत न्याय करण्यासाठी कोणाला नियुक्त केलं जातं का? (शिकवणे अभ्यास १८)
ख्रिस्ती जीवन
तुम्ही पायनियर म्हणून सेवा करू शकता का? (१० मि.) जुलै २०१६ च्या ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका यातल्या “तुम्ही हे एका वर्षासाठी करून बघू शकता का?” आणि “सामान्य पायनियरिंग करण्यासाठी आराखडा” या लेखांवर आधारित सेवा पर्यवेक्षकांची चर्चा. तसंच, यहोवा आपल्याला सेवाकार्यासाठी मदत करतो हा व्हिडिओ दाखवून त्यावर चर्चा करा.
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ २, प्रश्न ४-५
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत २७ आणि प्रार्थना