वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr21 मे पृ. १-१३
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०२१
  • उपशिर्षक
  • ३-९ मे
  • १०-१६ मे
  • १७-२३ मे
  • २४-३० मे
  • ३१ मे–६ जून
  • ७-१३ जून
  • १४-२० जून
  • २१-२७ जून
  • २८ जून–४ जुलै
जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०२१
mwbr21 मे पृ. १-१३

जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

३-९ मे

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  गणना २७-२९

“भेदभाव न करण्याच्या बाबतीत यहोवाचं अनुकरण करा”

टेहळणी बुरूज१३ ६/१५ ११ ¶१४

यहोवाच्या गुणांची मनापासून कदर करा

१४ त्या पाच बहिणींनी मोशेजवळ जाऊन त्याला असे विचारले: “[आमच्या बापाला] मुलगे नव्हते एवढ्यावरूनच आमच्या बापाचे नाव त्याच्या कुळातून का गाळावे?” त्यांनी मोशेला विनंती केली: “आम्हालाही आमच्या बापाच्या भाऊबंदांबरोबर वतन द्या.” त्यावर, ‘नियम म्हणजे नियम’ असे म्हणून मोशेने अडेल भूमिका घेतली का? नाही. “मोशेने त्यांचे हे प्रकरण परमेश्‍वरापुढे मांडले.” (गण. २७:२-५) यहोवाने कशी प्रतिक्रिया दाखवली? त्याने मोशेला म्हटले: “सलाफहादाच्या मुली बोलतात ते बरोबर आहे; त्यांच्या बापाच्या भाऊबंदांबरोबर तू त्यांना अवश्‍य वतनभाग द्यावा; त्यांच्या बापाचा वाटा त्यांच्या नावे कर.” यहोवा तेवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने, याविषयी मोशेच्या द्वारे एक नियम बनवला. त्याने म्हटले: “कोणी मनुष्य निपुत्रिक मेला तर त्याचे वतन त्याच्या मुलीला द्यावे.” (गण. २७:६-८; यहो. १७:१-६) तेव्हापासून, अशा प्रकारच्या समस्येला तोंड देणाऱ्‍या प्रत्येक इस्राएली स्त्रीचे संरक्षण होणार होते.

टेहळणी बुरूज१३ ६/१५ ११ ¶१५

यहोवाच्या गुणांची मनापासून कदर करा

१५ यहोवाचा निर्णय किती प्रेमळ व निःपक्ष होता! चांगल्या स्थितीत असलेल्या इतर इस्राएल लोकांशी यहोवा जितक्या आदराने वागला तितक्याच आदराने तो या लाचार स्त्रियांशीही वागला. (स्तो. ६८:५) यहोवा आपल्या सर्व सेवकांशी निःपक्षपातीपणे वागतो या दिलासादायक सत्यावर प्रकाश टाकणारा बायबलमधील हा केवळ एक वृत्तान्त आहे.—१ शमु. १६:१-१३; प्रे. कृत्ये १०:३०-३५, ४४-४८.

टेहळणी बुरूज१३ ६/१५ ११ ¶१६

यहोवाच्या गुणांची मनापासून कदर करा

१६ निःपक्षपाती असण्याच्या बाबतीत आपण यहोवाचे अनुकरण कसे करू शकतो? आठवणीत असू द्या, निःपक्षपाती असण्यासाठी दोन गोष्टींची गरज आहे. आपण जर स्वभावाने निःपक्षपाती असलो, तरच आपण सर्वांशी निःपक्षपातीपणे वागू. आपण निःपक्षपाती आहोत असे स्वतःबद्दल आपल्याला कदाचित वाटत असेल. पण, तुम्ही याच्याशी सहमत व्हाल की स्वतःच्या भावनांचे प्रामाणिकपणे परीक्षण करणे नेहमीच सोपे नसते. तर मग, इतरांच्या नजरेत आपण निःपक्षपाती आहोत का हे जाणून घेण्यासाठी आपण काय करू शकतो? येशूबद्दल लोक काय म्हणतात हे त्याला जाणून घ्यायचे होते, तेव्हा त्याने आपल्या भरवशालायक मित्रांना असे विचारले: “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?” (मत्त. १६:१३, १४) या बाबतीत तुम्ही येशूचे अनुकरण का करू नये? इतरांच्या दृष्टीत तुम्ही निःपक्षपाती आहात की नाही हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू शकेल अशा एखाद्या भरवशाच्या मित्राला तुम्ही विचारू शकता. तुमच्या मनात अजूनही काही प्रमाणात वांशिक, सामाजिक किंवा आर्थिक भेदभाव असल्याचे तुमचा मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला सांगते तेव्हा तुम्ही काय केले पाहिजे? आपल्या भावनांविषयी यहोवाला कळकळीने प्रार्थना करा; तुम्हाला तुमच्या मनोवृत्तीत फेरबदल करता यावा म्हणून त्याला विनंती करा, जेणेकरून तुम्हाला यहोवाप्रमाणे निःपक्षपातीपणे वागता येईल.—मत्त. ७:७; कलस्सै. ३:१०, ११.

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-२ ५२८ ¶५

अर्पणं

पेयार्पणं. इस्राएली लोक वचनयुक्‍त देशात राहू लागल्यानंतर ते अपर्णांसोबत पेयार्पणेही अर्पण करू लागले. (गण १५:२, ५, ८-१०) पेयार्पणात द्राक्षरस वापरला जायचा आणि अर्पण करताना वेदीवर पूर्णपणे ओतला जायचा. (गण २८:७, १४ ची तुलना निर्ग ३०:९; गण १५:१० सोबत करा.) फिलिप्पैकरांना लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौलने बांधवांना म्हटलं: “तुम्ही विश्‍वासामुळे देत असलेल्या बलिदानावर आणि पवित्र सेवेवर जरी मला पेयार्पणाप्रमाणे ओतलं जात असलं, तरी मी तुम्हा सगळ्यांसोबत याबद्दल खूप आनंदी आहे.” इथं पौलला हे सांगायचं होतं, की दाक्षारस जसा वेदीवर पूर्णपणे ओतला जायचा तसा तो आपल्या भाऊबहिणींसाठी स्वतःला पूर्णपणे द्यायला तयार होता. (फिलि २:१७) आपल्या मुत्युच्या काही काळाआधी त्याने तीमथ्यला लिहिलं: “मला पेयार्पणासारखं ओतलं जात आहे आणि माझ्या सुटकेची वेळ अगदी जवळ आली आहे.”—२ती ४:६.

१०-१६ मे

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  गणना ३०-३१

“घेतलेली शपथ पूर्ण करा”

इन्साइट-२ ११६२

नवस

केलेला नवस पूर्ण करणं गरजेचं होतं. इस्राएली लोक आपल्या इच्छेप्रमाणे देवाला नवस करू शकत होते. कोणालाही जबरदस्ती केली जायची नाही. पण नियमशास्त्राप्रमाणे एखाद्याने नवस केला तर त्याने तो पूर्ण करणंही गरजेचं होतं. त्यात असंही सांगण्यात आलं होतं की जेव्हा एखादी व्यक्‍ती नवस करते तेव्हा ती जणू ‘स्वतःवर बंधनं लादते.’ त्यामुळे तिने तो नवस किंवा शपथ जर पूर्ण केली नाही तर तिला मृत्यूची शिक्षा दिली जावी. (गण ३०:२; रोम १:३१, ३२ ही पाहा.) एखाद्या व्यक्‍तिने नवस किंवा शपथ घेण्याअगोदर या गोष्टीचा विचार करणं गरजेचं होतं की यामुळे तिच्यावर कोणकोणत्या जबाबदाऱ्‍या येतील आणि त्यासाठी ती तयार आहे का? याबद्दल नियमशास्त्रात स्पष्टपणे सांगितलं होतं, की “तुम्ही यहोवाला काही नवस केला, तर तो फेडायला उशीर लावू नका. कारण तुमचा देव यहोवा तुम्हाला न चुकता तो फेडायला लावेल; तुम्ही तो फेडला नाही, तर तुमच्यासाठी ते पाप ठरेल. पण तुम्ही नवस केलाच नाही, तर ते पाप ठरणार नाही.”—अनु २३:२१, २२.

इन्साइट-२ ११६२

नवस

नवस म्हणजे गंभीरपणे देवाला दिलेलं वचन. ते वचन अर्पण देण्याबद्दल, भेट देण्याबद्दल, त्याची सेवा करण्याबद्दलचं असू शकत होतं. किंवा मग ते अशा गोष्टींपासूनही दूर राहण्याबद्दल असू शकत होतं, ज्याबद्दल नियमशास्त्रात मनाई केली नव्हती. नवस करण्याबद्दल कोणत्याही इस्राएली व्यक्‍तीवर जबरदस्ती केली जात नव्हती. नवस करणं शपथ घेण्यासारखंच गंभीर होतं. काही वचनांमध्ये नवस करण्याचा आणि शपथ घेण्याचा सोबत उल्लेख केला आहे. (गण ३०:२; मत्त ५:३३) “नवस करणं” म्हणजे दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या हेतून वचन देणं आणि “शपथ घेणं” म्हणजे दिलेलं वचन आपण नक्की पूर्ण करू, हे सांगण्यासाठी आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्‍तीच्या नावाने हमी किंवा गॅरंटी देणं. एखादा करार करताना सहसा शपथ घेतली जायची.—उत्प २६:२८; ३१:४४, ५३.

टेहळणी बुरूज०४ ८/१ २७ ¶४

गणनाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

३०:६-८—एक ख्रिस्ती पुरुष आपल्या पत्नीने घेतलेली शपथ रद्द करू शकतो का? शपथांच्या बाबतीत, यहोवा आता आपल्या उपासकांशी व्यक्‍तिगतरीत्या व्यवहार करतो. उदाहरणार्थ, यहोवाला समर्पण करणे ही व्यक्‍तिगत शपथ आहे. (गलतीकर ६:५) ही शपथ बाजूला सारण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार पतीला नाही. परंतु, पत्नीने देवाच्या वचनाविरुद्ध किंवा तिच्या पतीप्रती असलेल्या जबाबदाऱ्‍यांविरुद्ध असलेली शपथ घेण्याचे टाळले पाहिजे.

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-२ २८ ¶१

इफ्ताह

यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्या मुलांना पवित्र ठिकाणासाठी देण्याचा अधिकार इस्राएली आईवडीलांना होता. हन्‍नाने यहोवाला वचन दिलं होतं, की जर तिला मुलगा झाला तर ती त्याला सेवा करण्यासाठी उपासना मंडपात देईल. हन्‍नाचा पती एलकाना याने हा नवस मान्य केला. म्हणूनच शमुवेलचं दूध तुटलं तेव्हा ती त्याला उपासना मंडपात सेवा करण्यासाठी घेऊन गेली. त्यावेळी तिने अर्पण करण्यासाठी सोबत एक बैलसुद्धा नेला होता. (१शमु १:११, २२-२८; २:११) शमुवेलसारखं शमशोनलाही नाझीर म्हणून सेवा करण्यासाठी एका खास पद्धतीने निवडण्यात आलं होतं.—शास १३:२-५, ११-१४.

१७-२३ मे

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  गणना ३२-३३

“त्या देशातल्या सर्व रहिवाशांना हाकलून लावा”

टेहळणी बुरूज१०-E ८/१ २३

तुम्हाला माहीत होतं का?

इब्री शास्त्रात उल्लेख केलेली ‘पूजेची उच्च स्थानं’ काय होती?

देवाने इस्राएली लोकांना जो देश देण्याचं वचन दिलं होतं, तिथे आधी कनानी लोक राहायचे. त्यांनी तिथे पूजेची स्थानं बनवली होती. त्यामुळे त्या देशात जाण्याआधी यहोवाने इस्राएली लोकांना अशी आज्ञा दिली की तुम्ही “त्यांच्या सर्व कोरीव मूर्ती व धातूचे पुतळे नष्ट करा. तसंच त्यांची पूजेची सर्व उच्च स्थानं तोडून-फोडून टाका.” (गणना ३३:५२) पूजेची ही उच्चं स्थानं सहसा डोंगरांवर मोकळ्या ठिकाणी बांधली जायची. याशिवाय काही स्थानं हिरव्यागार झाडांखाली किंवा माणसांनी बांधलेल्या ओट्यांवर बांधली जायची. (१ राजे १४:२३; २ राजे १७:२९; यहेज्केल ६:३) या ठिकाणी वेदी, पूजेचे स्तंभ, पूजेचे खांब, मूर्तीं, धूपस्तंभ आणि पूजेसाठी लागणाऱ्‍या दुसऱ्‍या वस्तू ठेवल्या जायच्या.

टेहळणी बुरूज०८ २/१५ २७ ¶४-५

इस्राएली लोकांच्या चुकांवरून धडा घ्या

आज आपल्याला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. यांपैकी बरीच, इस्राएल लोकांना तोंड द्याव्या लागलेल्या आव्हानांसारखीच आहेत. आधुनिक मानवसमाजातही अनेक दैवते आहेत. पैसा, मनोरंजन व क्रीडाविश्‍वातील लोकप्रिय व्यक्‍तिमत्त्वे, राजकीय पक्ष, काही धर्मपुढारी, इतकेच काय तर कधीकधी कुटुंबातील सदस्यांनाही देवाचा दर्जा दिला जातो. यांपैकी कोणतीही गोष्ट आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनू शकते. ज्यांचे यहोवावर प्रेम नाही अशा लोकांसोबत जवळचे संबंध जोडल्यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या आपला नाश होऊ शकतो.

अनैतिक लैंगिक संबंध बआल उपासनेचे एक अविभाज्य अंग होते. यामुळेच बरेच इस्राएल लोक बआल उपासेनेकडे आकर्षित झाले व या पाशाला बळी पडले. आजही देवाच्या लोकांपैकी अनेकजण अशाचप्रकारच्या पाशांना बळी पडत आहेत. उदाहरणार्थ, आज इंटरनेटवर अश्‍लील साहित्य अगदी सहजपणे उपलब्ध आहे. एखाद्या अतिउत्सुक किंवा बेसावध व्यक्‍तीने आपल्या कंप्युटरची फक्‍त एक कळ दाबली तरी तो आपला शुद्ध विवेक गमावून बसू शकतो. अशारितीने जर एखादी ख्रिस्ती व्यक्‍ती इंटरनेटवरील अश्‍लीलतेला बळी पडली तर ते किती दुःखदायक ठरेल!

इन्साइट-१ ४०४ ¶२

कनान

यहोवाने मोशेद्वारे यहोशवाला आज्ञा दिली होती की त्यांने कनानी लोकांचा नाश करावा. आणि यहोशवाने अगदी तसंच केलं त्याने ‘एकही गोष्ट करण्याची सोडली नाही.’ (यहो ११:१५) पण पुढे जाऊन इस्राएली लोक यहोशवासारखे वागले नाहीत. त्यांनी कनानी लोकांचा नाश केला नाही; त्यांना जिवंत राहू दिलं. त्यामुळे इस्राएल देशात गुन्हेगारी, अनैतिक कामं आणि मुर्तिपूजा होऊ लागली. आणि यामुळे बऱ्‍याच लोकांनी आपला जीव गमावला. जर इस्राएली लोकांनी यहोवाचं ऐकून कनानी लोकांचा नाश केला असता, तर असं झालं नसतं. (गण ३३:५५, ५६; शास २:१-३, ११-२३; स्तो १०६:३४-४३) यहोवाने इस्राएली लोकांना आधीच इशारा दिला होता, की जर त्यांनी कनानी लोकांसोबत मैत्री केली, त्यांच्यासोबत लग्नसंबंध जोडले, त्यांचे धार्मिक रितीरिवाज पाळले आणि त्यांच्यासारख्या घृणित गोष्टी केल्या तर यहोवा त्यांना शिक्षा देईल. त्याने जसा कनानी लोकांचा नाश केला तसाच इस्राएली लोकांचाही तो नाश करेल. आणि त्यांना देशातून हाकलून लावेल.—निर्ग २३:३२, ३३; ३४:१२-१७; लेवी १८:२६-३०; अनु ७:२-५, २५, २६.

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-१ ३५९ ¶२

हद्द

प्रत्येक वंशाला कुठे जमीन दिली जाईल हे चिठ्ठ्या टाकून ठरवल्यानंतर त्यांना जमिनीचा किती मोठा भाग मिळेल हे ठरवावं लागणार होतं. यहोवाने त्यांना म्हटलं: “तुम्ही चिठ्ठ्या टाकून वारशाची जमीन तुमच्या घराण्यांमध्ये वाटून घ्या. मोठ्या घराण्यांसाठी मोठा वाटा आणि लहान घराण्यांसाठी लहान वाटा, वारसा म्हणून दिला जावा. जी चिठ्ठी निघेल त्याप्रमाणे प्रत्येकाला वारसा मिळेल.” (गण ३३:५४) अशा प्रकारे जमीन कोणत्या ठिकाणी मिळेल हे ठरवण्यात आलं. पण वारशाने मिळणाऱ्‍या या जमिनीचा हिस्सा मात्र वंशातल्या लोकांच्या संख्येनुसार कमी-जास्त केला जाऊ शकत होता. त्यामुळे यहूदा वंशाला मिळालेल्या जमिनीचा वाटा खूपच मोठा आहे हे लक्षात आल्यावर त्याचा काही भाग शिमोनच्या वंशाला देण्यात आला.—यहो १९:९.

२४-३० मे

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  गणना ३४-३६

“यहोवाचा आश्रय घ्या”

टेहळणी बुरूज१७.११ ९ ¶४

तुम्ही यहोवाचा आश्रय घेत आहात का?

४ एखाद्या इस्राएली व्यक्‍तीच्या हातून चुकून कोणाचा खून झाल्यास काय? खून जरी चुकून झाला असला, तरी निरपराध व्यक्‍तीच्या रक्‍तपाताबद्दल ती व्यक्‍ती दोषी असायची. (उत्प. ९:५) पण अशा वेळी मात्र दया दाखवण्यात यावी असं यहोवाने सांगितलं होतं. अजाणतेत खून केलेली व्यक्‍ती ‘सूड घेणाऱ्‍यापासून’ स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इस्राएलातल्या सहा शरणपुरांपैकी कोणत्याही शरणपुरात पळून जाऊ शकत होती. शरणपुरात राहण्याची परवानगी मिळल्यानंतर ती व्यक्‍ती सुरक्षित असायची. पण त्यासाठी तिला महायाजकाचा मृत्यू होईपर्यंत त्या शरणपुरातच राहावं लागायचं.—गण. ३५:१५, २८.

टेहळणी बुरूज१७.११ ९ ¶६

तुम्ही यहोवाचा आश्रय घेत आहात का?

६ एका इस्राएली मनुष्याकडून अजाणतेत कोणाचा खून झाल्यास त्याला एखाद्या शरणपुरात पळून जावं लागायचं आणि नगराच्या वेशीजवळ असलेल्या “वडील मंडळीस आपली हकीगत सांगावी” लागायची; आणि तिथल्या वडिलांनी त्याचा स्वीकार करायचा होता. (यहो. २०:४) मग काही काळानंतर, ज्या नगरात त्याच्याकडून खून झाला होता त्या नगरातल्या वडिलांकडे त्याचा न्याय करण्यासाठी ते त्याला पाठवायचे. (गणना ३५:२४, २५ वाचा.) त्या वडिलांना जर दिसून आलं, की त्याच्याकडून झालेला खून हा अजाणतेत झाला होता, तर ते त्याला परत त्या शरणपुरात पाठवायचे.

टेहळणी बुरूज१७.११ ११ ¶१३

तुम्ही यहोवाचा आश्रय घेत आहात का?

१३ सूड उगवणाऱ्‍यापासून आपला जीव वाचवण्यासाठी शरणपुरात आल्यानंतर तो मनुष्य सुरक्षित असायचा. यहोवाने म्हटलं होतं, की शरणपुरांमुळे एखाद्या मनुष्याला सूड उगवणाऱ्‍यापासून स्वतःचा बचाव करणं शक्य होईल. (यहो. २०:२, ३) शरणपुरात पळून आलेल्या व्यक्‍तीचा एकदा न्याय झाला असल्यामुळे, पुन्हा त्याच कारणावरून त्याचा न्याय करण्यात यावा अशी अपेक्षा यहोवाने केली नाही. शिवाय, सूड उगवणाऱ्‍या व्यक्‍तीलासुद्धा त्या मनुष्याला मारण्यासाठी शरणपुरात प्रवेश मिळत नसे. म्हणूनच, शरणपुरात पळून आलेला मनुष्य यहोवाच्या हाताखाली अगदी सुरक्षित असायचा. तिथे त्याची स्थिती कैद्यासारखी नसायची. शरणपुरात तो कामकाज करू शकत होता, इतरांना मदत करू शकत होता आणि शांत मनाने यहोवाची सेवा करू शकत होता. एकंदर, त्याला एक आनंदी व समाधानकारक जीवन जगणं शक्य होतं!

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज९१-E २/१५ १३ ¶१३

सगळ्यांसाठी दिलेल्या खंडणीची पूरेपुर किंमत

१३ खंडणी बलिदानाचा फायदा आदाम किंवा हव्वाला मिळणार नाही. कारण नियमशास्त्रात हे सांगितलं होतं की, “ज्याला मृत्युदंड दिला गेला पाहिजे, अशा खुन्याच्या जिवासाठी तुम्ही खंडणी घेऊ नका.” (गणना ३५:३१) आदामने नकळत नाही, तर जाणूनबुजून पाप केलं होतं. (१ तीम २:१४) तो आणि हव्वा परिपूर्ण होते तरीही त्यांनी मुद्दामून देवाचा नियम मोडला. त्यामुळे त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा मिळणं गरजेचं होतं. आदाम आणि हव्वामुळे त्यांचे वंशज अपरिपूर्ण झाले आणि त्यांच्यामध्ये मरण पसरलं. त्यांचा मुत्यृ आदाम आणि हव्वामुळे झाला होता; म्हणून आदाम आणि हव्वा खूनी होते. यामुळेच यहोवाने खंडणीच्या व्यवस्थेपासून त्यांना फायदा होऊ दिला नाही. त्यांना पापाची मजूरी म्हणून मरण देण्यात आलं. पण त्यांच्या वंशजाना मिळालेली मुत्यूची शिक्षा मात्र यहोवाने रद्द केली. (रोमकर ५:१६) येशूने आपला जीव खंडणी म्हणून दिला आणि ‘सर्व माणसांसाठी’ म्हणजेच आदामच्या सर्व वंशजांसाठी ‘मृत्यू सोसला’. त्याच्या खंडणी बलिदानामुळे सर्व माणसांना मूत्युपासून सुटका मिळू शकते.—इब्री लोकांना २:९; २ करिंथकर ५:२१; १ पेत्र २:२४.

३१ मे–६ जून

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  अनुवाद १-२

“न्याय करणारा देव आहे”

टेहळणी बुरूज९६ ३/१५ २२ ¶६

यहोवा धार्मिकता आणि न्याय यांचा चाहता

मंडळीच्या नियुक्‍त वडिलांना गंभीर चुकांच्या बाबतीत न्याय करावाच लागतो. (१ करिंथकर ५:१२, १३) असे करत असताना, ते हे लक्षात ठेवतात, की देवाचा न्याय शक्य तेथे दया दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, त्यासाठी कोणताही आधार नसल्यास—जसे की, अपश्‍चात्तापी पापी लोकांच्या बाबतीत—तेथे दया दाखवता येणार नाही. पण अशा प्रकारच्या अपराध्याला वडील जन द्वेषयुक्‍त भावनेमुळे मंडळीतून बाहेर काढून टाकत नाहीत. बहिष्कृतीकरण त्या व्यक्‍तीला ताळ्यावर आणील अशी आशा ते बाळगतात. (पडताळा यहेज्केल १८:२३.) ख्रिस्ताच्या मस्तकपदाखाली, वडील जन न्याय हा हेतू मनी बाळगून सेवा करत असतात आणि यामध्ये “वाऱ्‍यापासून आसरा” याच्यासारखे होणे समाविष्ट आहे. (यशया ३२:१, २) यास्तव, त्यांनी निःपक्षपातीपणा व समंजसपणा प्रकट करावा.—अनुवाद १:१६, १७.

टेहळणी बुरूज०२ ८/१ ९ ¶४

ईश्‍वरी अधिकाराला एकनिष्ठपणे अधीन राहणे

४ पण न्यायाधीशाला केवळ देवाच्या नियमशास्त्राविषयीचे ज्ञान असणे पुरेसे नव्हते. अपरिपूर्ण असल्यामुळे या वडिलजनांना—स्वार्थीपणा, पक्षपातीपणा आणि लोभीपणा—यांसारख्या न्यायास भ्रष्ट करू शकणाऱ्‍या स्वतःच्या प्रवृत्ती नियंत्रणात ठेवण्याची खास काळजी घ्यावी लागत होती. मोशेने त्यांना सांगितले: “न्याय करिताना पक्षपात करू नका, लहानमोठ्यांचे सारखेच ऐकून घ्या; कोणाचे तोंड पाहून भिऊ नका; कारण न्याय करणे देवाचे काम आहे.” (तिरपे वळण आमचे.) होय, इस्राएली न्यायी देवाच्या वतीने न्याय करत होते. खरोखर हा किती मोठा बहुमान!—अनुवाद १:१६, १७.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज१३ ९/१५ ९ ¶९

यहोवाच्या सूचना भरवशालायक आहेत

९ इस्राएली लोकांना ४० वर्षे भयानक अरण्यातून प्रवास करावा लागला. पण, या प्रवासादरम्यान यहोवा कशा प्रकारे त्यांचे मार्गदर्शन, संरक्षण व पालनपोषण करणार होता हे त्याने आधीपासूनच त्यांना स्पष्टपणे सांगितलेले नव्हते. तरीपण, यहोवाने वारंवार त्यांना हे दाखवून दिले की त्याच्यावर व त्याच्या मार्गदर्शनावर ते भरवसा ठेवू शकत होते. दिवसा मेघस्तंभाद्वारे आणि रात्री अग्नीच्या स्तंभाद्वारे यहोवाने इस्राएली लोकांना याची आठवण करून दिली की त्या खडतर परिस्थितीतून जात असताना तो सतत त्यांच्यासोबत होता. (अनु. १:१९; निर्ग. ४०:३६-३८) त्याने त्यांच्या मूलभूत गरजादेखील पुरवल्या. “त्यांची वस्त्रे जीर्ण झाली नाहीत; त्यांच्या पायांस सूज आली नाही.” खरोखर, त्यांना “कशाचीही वाण पडली नाही.”—नहे. ९:१९-२१.

७-१३ जून

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  अनुवाद ३-४

“यहोवाचे नियम पाळण्यातच समजुतदारपणा आहे”

इन्साइट-२ ११४० ¶५

समजबुद्धी

जी व्यक्‍ती देवाच्या वचनाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करते आणि त्याच्या आज्ञा पाळते ती समजुतदार बनते. तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या आणि तिच्या शिक्षकांपेक्षाही जास्त सखोल समज तिच्याकडे असते. (स्तो ११९:९९, १००, १३० ची तुलना लूक २:४६, ४७ सोबत करा.) देवाने दिलेल्या नियमांमध्ये त्याची समजबुद्धी दिसून येते. त्यामुळे जर इस्राएली लोकांनी त्याचे नियम पाळले असते तर इतर राष्ट्रातल्या लोकांना ते “खरोखरच बुद्धिमान आणि समजदार आहेत,” हे दिसून आलं असतं. (अनु ४:५-८; स्तो १११:७, ८, १० ची तुलना १रा २:३ सोबत करा.) समजबुद्धी असलेल्या व्यक्‍तीला हे माहित असतं की देवाच्या वचनातच खरी बुद्धी आहे त्यामुळे ती देवाच्या इच्छेविरूद्ध कोणतीही गोष्ट करत नाही. ती त्याच्या आज्ञा पाळते आणि मदतीसाठी त्याला प्रार्थना करते. (स्तो ११९:१६९) ती देवाचं वचन आपल्या मनात खोलवर रूजू देते. (मत्त १३:१९-२३) जणू आपल्या “हृदयाच्या पाटीवर” ते लिहून ठेवते. (नीत ३:३-६; ७:१-४) आणि “प्रत्येक खोट्या मार्गाचा” द्वेष करते. (स्तो ११९:१०४) देवाचा मुलगा येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्यानेही अशाच प्रकारे समजबुद्धी दाखवली. देवाच्या वचनात त्याच्याविषयी जे लिहिलं होतं ते पूर्ण व्हावं म्हणून तो वधस्तंभावर मरण्यासाठीही तयार झाला.—मत्त २६:५१-५४.

टेहळणी बुरूज९९ ११/१ २० ¶६-७

जगावेगळी उदारता

ऐकलेल्या आणि पाहिलेल्या सर्व गोष्टींनी अचंबित होऊन राणी नम्रपणे असे म्हणाली: “हे आपले सेवक, ज्यांना आपणासमोर सतत उभे राहून आपल्या शहाणपणाचा लाभ होत असतो ते धन्य होत!” (१ राजे १०:४-८) शलमोनाचे सेवक संपन्‍नतेत राहत होते; पण त्यासाठी तिने त्यांना धन्य म्हटले नाही. त्याउलट, देवाने शलमोनाला दिलेले शहाणपण सतत ऐकू शकत असल्यामुळे ते धन्य होते. स्वतः निर्माणकर्ता आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त यांच्या बुद्धीचा अनुभव घेणाऱ्‍या यहोवाच्या आजच्या लोकांपुढे शबाच्या राणीचे केवढे अप्रतिम उदाहरण आहे!

शिवाय, राणीने पुढे शलमोनाला जे म्हटले ते देखील उल्लेखनीय होते: “यहोवा तुझा देव धन्यवादित असो.” (१ राजे १०:९, पं.र.भा.) शलमोनाला यहोवाच्याच आशीर्वादाने बुद्धी आणि संपन्‍नता लाभली होती हे तिने ओळखले. ही गोष्ट, यहोवाने इस्राएलला दिलेल्या अभिवचनाच्या एकवाक्यतेत आहे. तो म्हणाला होता ‘माझ्या आज्ञा पाळल्यामुळे देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल. त्या सर्व विधींसंबंधी ऐकून ते म्हणतील की, हे महान राष्ट्र खरोखर बुद्धीमान व समंजस लोकांचे आहे.”—अनुवाद ४:५-७.

टेहळणी बुरूज०७ ८/१ ३० ¶१३

तुम्ही “देवविषयक बाबतीत धनवान” आहात का?

१३ यहोवा जेव्हा आपल्या लोकांवर आशीर्वादांचा वर्षाव करतो तेव्हा तो नेहमी त्यांना जे उत्तम आहे ते देतो. (याकोब १:१७) उदाहरणार्थ, यहोवाने इस्राएली लोकांना राहण्याकरता जागा दिली तेव्हा तो ‘दुधामधाचे प्रवाह वाहणारा देश’ होता. मिसर अर्थात ईजिप्त देशाचे वर्णन देखील असेच करण्यात आले होते तरीसुद्धा यहोवाने इस्राएली लोकांना दिलेला देश निदान एका बाबतीत तरी वेगळा होता. “तुझा देव परमेश्‍वर त्या देशाची काळजी वाहतो,” असे मोशेने इस्राएल लोकांना सांगितले. दुसऱ्‍या शब्दांत, यहोवा त्यांचा सांभाळ करणार असल्यामुळे त्यांची भरभराट होणार होती. जोपर्यंत इस्राएली लोक यहोवाशी विश्‍वासू राहिले तोपर्यंत त्यांनी यहोवाच्या विपुल आशीर्वादांचा आनंद उपभोगला आणि त्यांचे जीवन, त्यांच्या आजूबाजूच्या सर्व राष्ट्रांपेक्षा सर्वश्रेष्ठ होते, हे स्पष्ट दिसत होते. होय, यहोवाचा आशीर्वाद “समृद्धि देतो.”—गणना १६:१३; अनुवाद ४:५-८; ११:८-१५.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०४ ९/१५ २५ ¶३

अनुवादाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

४:१५-२०, २३, २४—कोरीव मूर्ती करण्याविरुद्ध लावण्यात आलेल्या प्रतिबंधानुसार कलात्मक उद्देशांसाठी एखाद्या वस्तूची प्रतिमा तयार करणेही अयोग्य आहे का? नाही. ही आज्ञा, उपासना करण्याच्या उद्देशाने प्रतिमा तयार करण्याविरुद्ध होती—‘त्यांना दंडवत घालण्याविरुद्ध व त्यांची पूजा करण्याविरुद्ध’ होती. शास्त्रवचनांत कलात्मक उद्देशांसाठी मूर्ती कोरण्याविरुद्ध किंवा निरनिराळ्या वस्तूंची चित्रे रंगवण्याविरुद्ध कोणतीही आज्ञा नाही.—१ राजे ७:१८, २५.

१४-२० जून

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  अनुवाद ५-६

“तुमच्या मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवा”

टेहळणी बुरूज०५ ७/१ १२ ¶११

आईवडिलांनो, आपल्या कुटुंबाच्या गरजा पुरवा

११ या विषयाच्या संदर्भात अनुवाद ६:५-७ मधील उतारा सर्वात जास्त वेळा वापरला जातो. कृपया आपले बायबल उघडून ही वचने वाचा. आईवडिलांना प्रथम स्वतःची आध्यात्मिकता वाढवण्याचे, यहोवाबद्दलचे प्रेम अधिक बळकट करण्याचे व त्याची वचने आपल्या अंतःकरणात ग्रहण करण्याचे प्रोत्साहन दिले आहे याकडे लक्ष द्या. होय, तुम्ही स्वतः देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास केला पाहिजे. बायबलचे नियमित वाचन केले पाहिजे आणि त्यावर मनन केले पाहिजे जेणेकरून यहोवाचे मार्ग, त्याची तत्त्वे व नियम तुम्हाला चांगल्याप्रकारे समजतील आणि प्रिय वाटू लागतील. परिणामस्वरूप, तुमचे अंतकरण बायबल सत्यांनी काठोकाठ भरलेले असेल आणि आपोआपच यहोवाबद्दलचे प्रेम, आनंद आणि विस्मयाच्या भावना तुमच्या मनातून ओसंडून वाहतील. आपल्या मुलांना देण्यासारख्या असंख्य चांगल्या गोष्टी तुमच्याजवळ असतील.—लूक ६:४५.

टेहळणी बुरूज०७-E ५/१५ १५-१६

मी माझ्या मुलांना योग्य शिक्षण कसं देऊ?

आईवडील जे बोलतात फक्‍त त्यातूनच नाही तर त्यांच्या वागण्यातूनही हे दिसून येतं की जीवनात त्यांचं ध्येय काय आहे, तत्त्व काय आहेत आणि कोणत्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. (रोमकर २:२१, २२) अगदी लहान असल्यापासूनच मुलं आईवडिलांना बघतात आणि त्यातून शिकतात. त्यांच्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे मुलांना कळू लागतं. आणि पुढे याच गोष्टी त्यांच्यासाठीही महत्त्वाच्या बनतात. तुमचं जर यहोवावर खरंच प्रेम असेल तर ते मुलांनाही दिसून येईल. उदाहरणार्थ, जेव्हा तुमची मुलं पाहतील की तुम्ही रोज बायबल वाचता, वैयक्‍तिक अभ्यास करता, राज्याच्या कार्याला जीवनात पहिलं स्थान देता तेव्हा त्यांना कळेल की या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. (मत्तय ६:३३) जेव्हा तुम्ही न चुकता सभांना उपस्थित राहता, प्रचार कार्यात सहभाग घेता, तेव्हा मुलांच्या हे लक्षात येईल की यहोवाची पवित्र सेवा करणं तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे.—मत्तय २८:१९, २०; इब्री लोकांना १०:२४, २५.

टेहळणी बुरूज०५ ७/१ १२ ¶१४

आईवडिलांनो, आपल्या कुटुंबाच्या गरजा पुरवा

१४ अनुवाद ६:७ नुसार, मुलांसोबत आध्यात्मिक विषयांवर चर्चा करण्याचे अनेक प्रसंग असू शकतात. सोबत प्रवास करताना, घरातली कामे करताना, किंवा विरंगुळा करताना तुम्ही आपल्या मुलांच्या आध्यात्मिक गरजा पुरवण्याच्या संधी शोधू शकता. अर्थात, यासाठी बायबलमधील सत्यांविषयी रात्रंदिवस त्यांना “भाषण” देत राहण्याची गरज नाही. त्याऐवजी, कौटुंबिक संभाषणे नेहमी उभारणीकारक व आध्यात्मिक स्वरूपाची असू द्या. उदाहरणार्थ, सावध राहा! नियतकालिकात निरनिराळ्या विषयांवर अनेक लेख येतात. या लेखांच्या मदतीने तुम्ही यहोवाने निर्माण केलेले प्राणी, निसर्गरम्य ठिकाणे तसेच मानवी संस्कृतींतील व जीवनशैलींतील अद्‌भूत विविधता यांसारख्या विषयांवर संभाषण करू शकता. अशाप्रकारच्या संभाषणांमुळे तरुणांना विश्‍वासू व बुद्धिमान दासाने प्रकाशित केलेले साहित्य वाचण्याची प्रेरणा मिळू शकते.—मत्तय २४:४५-४७.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज१९.०२ २२ ¶११

नियमशास्त्रातून यहोवाचं प्रेम आणि न्याय कसा दिसून आला?

११ धडे: यहोवा एका व्यक्‍तीचं फक्‍त बाह्‍यस्वरूपच पाहत नाही, तर ती व्यक्‍ती आतून कशी आहे, तिचं मन कसं आहे हेही तो पाहतो. (१ शमु. १६:७) आपल्या मनातील कोणताही विचार, कोणतीही भावना, कोणतेही कार्य आपण यहोवापासून लपवू शकत नाही. यहोवा आपल्यामधल्या चांगल्या गोष्टी पाहतो आणि चांगलं करत राहण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देतो. पण त्याची इच्छा आहे की आपण आपल्या मनातील चुकीचे विचार ओळखावे आणि आपल्या हातून एखादी चूक घडण्याआधीच त्या विचारांवर नियंत्रण करावं.​—२ इति. १६:९; मत्त. ५:२७-३०.

२१-२७ जून

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  अनुवाद ७-८

“तुम्ही त्यांच्याशी लग्नाचे संबंध जोडू नका”

टेहळणी बुरूज१२-E ७/१ २९ ¶२

यहोवाने आपल्या लोकांना फक्‍त सहउपासकांशीच लग्न करण्याची आज्ञा का दिली होती?

यहोवाला माहीत होतं की सैतान आपल्या लोकांना खोटी उपासना करण्याच्या पाशात अडकवून भष्ट्र करण्याचा प्रयत्न करेल. म्हणुनच यहोवाने आपल्या लोकांना आधीच इशारा दिला होता की खोट्या देवतांची उपासना करणारे लोक “तुमच्या मुलांना माझी उपासना सोडून इतर देवांच्या मागे जायला लावतील.” ही खूप गंभीर गोष्ट होती. कारण जर इस्राएली लोकांनी दुसऱ्‍या देवांची उपासना केली असती तर यहोवाचा आशीर्वाद त्यांनी गमावला असता आणि त्यांना यहोवाकडून संरक्षणही मिळालं नसतं. त्यामुळे शत्रूंनी त्यांच्यावर हल्ला केला असता आणि त्यांचा नाश झाला असता आणि त्यामुळे सहाजिकच मसीहाचा जन्म त्या राष्ट्रात झाला नसता. त्यामुळे इस्राएली लोकांना देवाचे उपासक नसलेल्या लोकांशी लग्न करण्याच्या पाशात अडकवणं हा सैतानाचा खूप मोठा कट होता असं म्हणता येईल.

टेहळणी बुरूज१५ ३/१५ ३०-३१

“केवळ प्रभूमध्ये” लग्न करण्याची आज्ञा—आजही व्यावहारिक?

तरीसुद्धा, यहोवानं केवळ प्रभूमध्ये लग्न करा अशी आज्ञा दिली आहे. का बरं? कारण कोणत्या गोष्टी आपल्या हिताच्या आहेत हे त्याला माहीत आहे. चुकीचा निर्णय घेतल्यानं होणाऱ्‍या नुकसानापासून आणि दुःखद परिणामांपासून आपलं संरक्षण व्हावं अशी त्याची इच्छा आहे. नहेम्याच्या दिवसांत कित्येक यहुदी लोक यहोवाला न मानणाऱ्‍या स्त्रियांशी लग्न करत होते. म्हणून नहेम्यानं शलमोनाच्या वाईट उदाहरणाची आठवण त्यांना करून दिली. त्यानं म्हटलं, “तो देवाचा आवडता असून त्याला सर्व इस्राएलावर राजा केले होते, तरी त्यालाही अन्य जातींच्या स्त्रियांनी पापात पाडले.” (नहे. १३:२३-२६) यहोवाला माहीत आहे, की त्याच्या तत्त्वांची आठवण आपल्याला करून देणं हे आपल्याच भल्यासाठी आहे. म्हणूनच तर ख्रिश्‍चनांना त्यानं केवळ प्रभूमध्ये लग्न करण्याची आज्ञा दिली आहे. (स्तो. १९:७-१०; यश. ४८:१७, १८) तेव्हा अशा प्रेमळ व भरवशालायक सल्ल्यासाठी आपण त्याचे आभार मानले पाहिजे. शिवाय, जेव्हा आपण यहोवाला आपला सर्वोच्च राजा म्हणून स्वीकारतो, तेव्हा आपण काय करावं हे सांगण्याचा अधिकार त्याला आहे, असं आपण मान्य करत असतो.—नीति. १:५.

टेहळणी बुरूज१५ ८/१५ २६ ¶१२

या शेवटल्या काळात तुम्ही कोणाची सोबत निवडाल?

१२ ख्रिश्‍चनांनी आपला विवाह सोबती निवडण्याच्या बाबतीत खूप सावध असलं पाहिजे. देवाचं वचन आपल्याला अशी ताकीद देतं: “तुम्ही विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीति व स्वैराचार यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाफ कसा होणार?” (२ करिंथ. ६:१४) बायबल देवाच्या सेवकांना ‘केवळ प्रभूमध्ये लग्न’ करण्यास सांगतं. म्हणजे, ज्या व्यक्‍तीनं समर्पण करून बाप्तिस्मा घेतला आहे आणि जी यहोवाच्या दर्जांनुसार जगत आहे, केवळ अशा व्यक्‍तीसोबतच लग्न करण्यास बायबल सांगतं. (१ करिंथ. ७:३९) तुम्ही जर असा जोडीदार निवडला ज्याचं यहोवावर प्रेम आहे, तर तो तुम्हालाही यहोवाला विश्‍वासू राहण्यास मदत करेल.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०४ २/१ १३ ¶४

यहोवा आपल्या दररोजच्या गरजा भागवतो

४ दररोजच्या भाकरीकरता प्रार्थना करताना आपल्याला दररोजच्या आध्यात्मिक अन्‍नाचीही आठवण झाली पाहिजे. दीर्घकाळ उपवास केल्यानंतर भुकेने व्याकूळ असतानाही येशूने दगडांच्या भाकरी करण्याच्या सैतानाने आणलेल्या मोहाचा प्रतिकार केला. त्याने म्हटले: “‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल’ असा शास्त्रलेख आहे.” (मत्तय ४:४) येशूने येथे मोशेचे शब्द उद्धृत केले; मोशेने इस्राएलांना म्हटले होते, “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल ह्‍याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली, आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्‍ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले.” (अनुवाद ८:३) यहोवाने ज्याप्रकारे मान्‍ना पुरवला त्यावरून इस्राएलांना केवळ शारीरिक अन्‍नच नव्हे तर आध्यात्मिक धडे देखील शिकायला मिळाले. पहिली गोष्ट म्हणजे, त्यांना केवळ “एकएका दिवसाला पुरेल इतके जमा करावे” असे सांगण्यात आले होते. त्यापेक्षा जास्त त्यांनी जमा केले तर त्यात किडे पडून त्याला दुर्गंध येऊ लागे. (निर्गम १६:४, २०) पण सहाव्या दिवशी मात्र असे घडत नव्हते, कारण या दिवशी त्यांना शब्बाथ दिवशीही पुरावा म्हणून दुप्पट मान्‍ना घेण्याची आज्ञा होती. (निर्गम १६:५, २३, २४) अशारितीने मान्न्याच्या तरतुदीने त्यांना आज्ञाधारकतेचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांना याची जाणीव करून दिली की त्यांचे जीवन केवळ भाकरीवर नव्हे तर ‘परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनावर’ अवलंबून होते.

२८ जून–४ जुलै

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  अनुवाद ९-१०

“तुमचा देव यहोवा तुमच्याकडून आणखी काय मागतो?”

टेहळणी बुरूज१० ७/१ १६ ¶३-४

यहोवा आपल्याकडून काय मागतो?

देवाची आज्ञा पूर्ण मनाने मानण्यास आपल्याला काय प्रेरित करेल? मोशे एका गोष्टीबद्दल सांगतो: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याचे भय धरावे.” (वचन १२) हे वाईट परिणामांच्या भीतीमुळे वाटणारे भय नाही तर देव व त्याच्या मार्गांबद्दल वाटणारे हितकारक, आदरयुक्‍त भय आहे. जर आपल्या मनात देवाबद्दल गहिरा आदर असेल तर तो नाखुश होईल असे आपण काहीही करणार नाही.

कोणत्या प्रमुख कारणामुळे आपण देवाची आज्ञा मानली पाहिजे? मोशेने इस्राएली लोकांना असे म्हटले की तुम्ही “त्याच्यावर [यहोवावर] प्रीति करावी, पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने तुझा देव परमेश्‍वर ह्‍याची सेवा करावी.” (वचन १२) देवावर माझे प्रेम आहे, फक्‍त असे म्हणणेच पुरेसे नाही यात आणखीही काही गोवलेले आहे. एक संदर्भ ग्रंथ स्पष्ट करतो: “भावनांसाठी जी इब्री क्रियापदे आहेत ती कधीकधी, या भावनांमुळे प्रेरित होऊन आपण जी कृती करतो त्यांस सूचित करतात.” हाच संदर्भ ग्रंथ पुढे असे म्हणतो की देवावर प्रेम करणे म्हणजे “कार्यांद्वारे आपले प्रेम व्यक्‍त करणे.” दुसऱ्‍या शब्दात सांगायचे झाल्यास, आपले खरेच देवावर प्रेम असेल तर आपण त्याला आनंदित करणाऱ्‍या मार्गांनी चालू.—नीतिसूत्रे २७:११.

टेहळणी बुरूज१० ७/१ १६ ¶६

यहोवा आपल्याकडून काय मागतो?

आपण जर मनापासून आज्ञांचे पालन केले तर आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतील. मोशेने लिहिले: ‘परमेश्‍वराच्या ज्या आज्ञा . . . मी आज तुझ्या बऱ्‍यासाठी सांगत आहे त्या तू पाळाव्यात.’ (वचन १३) होय, यहोवाची प्रत्येक आज्ञा अर्थात तो आपल्याकडून जे काही मागतो ते सर्व आपल्या हिताचेच आहे. देवाने आपल्याकडून अशी अपेक्षा करणे योग्यच आहे, “कारण देव प्रीति आहे” असे बायबल म्हणते. (१ योहान ४:८) त्याने आपल्याला अशाच आज्ञा दिल्या आहेत ज्यांचे पालन केल्याने आपले हित होते. (यशया ४८:१७) यहोवा आपल्याकडून ज्या अपेक्षा करतो त्या पूर्ण केल्याने आपण सध्या अनेक समस्यांपासून वाचू शकतो व भविष्यात आपल्याला त्याच्या राज्याधिकाराखाली अनंत काळासाठी आशीर्वाद मिळू शकतात.

यहोवा के करीब अध्या. २ ¶२

क्या आप सचमुच “परमेश्‍वर के करीब” आ सकते हैं?

२ प्राचीनकाल के इब्राहीम का, परमेश्‍वर के साथ ऐसा ही करीबी रिश्‍ता था। यहोवा ने इब्राहीम को ‘मेरा मित्र’ कहा। (यशायाह ४१:८, NHT) जी हाँ यहोवा, इब्राहीम को अपना करीबी दोस्त मानता था। परमेश्‍वर ने इब्राहीम को अपना दोस्त इसलिए स्वीकार किया, क्योंकि उसने “परमेश्‍वर पर विश्‍वास किया।” (याकूब २:२३, NHT) आज भी, यहोवा ऐसे मौकों की तलाश में रहता है कि वह कैसे अपने उन सेवकों के लिए “स्नेह” दिखाए जो प्रेम की खातिर उसकी सेवा करते हैं। (व्यवस्थाविवरण १०:१५) उसका वचन उकसाता है: “परमेश्‍वर के करीब आओ, और वह तुम्हारे करीब आएगा।” (याकूब ४:८, NW) इन शब्दों में हमें न सिर्फ एक न्यौता दिया गया है, बल्कि हमसे एक वादा भी किया गया है।

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-१ १०३

अनाकी लोक

अनाकी वंशाचे लोक उंच आणि धिप्पाड होते. हे लोक कनान देशातल्या डोंगराळ भागात खासकरून दक्षिणेकडे असलेल्या समुद्रकिनारी राहायचे. एके काळी अनाकी लोकांमधले तीन नावाजलेले पुरूष अहीमान, शेशय आणि तलमय हे हेब्रोनला राहायला आले होते. (गण १३:२२) १२ इस्राएली हेरांनी सर्वात आधी इथेच अनाकी लोकांना पाहिलं होतं. त्यांच्यापैकी दहा जणांनी या अनाकी लोकांबद्दल सांगून इस्राएली लोकांच्या मनात भीती घातली. त्यांनी म्हटलं की ते जलप्रलय येण्याआधी असणाऱ्‍या नेफिलीमसारखे आहेत आणि त्यांच्यासमोर आपण “टोळांसारखे” आहोत. (गण १३:२८-३३; अनु १:२८) अनाकी लोक इतके धिप्पाड होते की एमी आणि रेफाई वंशाच्या भल्यामोठ्या लोकांचं वर्णन करण्यासाठी त्यांचं उदाहरण दिलं जायचं. त्या काळात अनाकी लोकांबदद्‌ल असं म्हटलं जायचं की “अनाकच्या मुलांसमोर कोण उभं राहू शकतं?”—अनु २:१०, ११, २०, २१; ९:१-३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा