वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. ७
  • प्रश्‍न विचारा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न विचारा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • हृदयापर्यंत पोहोचा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • देवाच्या वचनाचा वापर करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोवाला मदतीसाठी प्रार्थना करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोवासोबत जवळचं नातं जोडायला तुमच्या बायबल विद्यार्थ्याला मदत करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. ७
स्टेशनवर एक जोडपं साक्षकार्य करताना एका व्यक्‍तीला पत्रिका देत आहे.

सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा

प्रश्‍न विचारा

यहोवा एक ‘आनंदी देव’ असल्यामुळे आपणही त्याची सेवा आनंदाने करावी असं त्याला वाटतं. (१ती १:११) आपण जसजसं आपल्या सेवेतली कौशल्यं वाढवू तसतसा आपला आनंदही वाढत जाईल. प्रश्‍न विचारल्यामुळे उत्सुकता वाढते आणि त्यामुळे चर्चा सहजपणे सुरू करता येते. प्रश्‍नांमुळे एखाद्याला विचार करायला आणि तर्क करायला मदत होते. (मत्त २२:४१-४५) आपण प्रश्‍न विचारला पाहिजे आणि लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. असं केल्यामुळे आपण हे दाखवत असतो, की समोरच्या व्यक्‍तीमध्ये आपल्याला आवड आहे. (याक १:१९) तसंच, तिने दिलेल्या उत्तरामुळे आपल्याला चर्चा पुढे सुरू ठेवायलाही मदत होते.

शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा-प्रश्‍न विचारून  हा व्हिडिओ दाखवा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • ‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा-प्रश्‍न विचारून’ या व्हिडिओतल्या एका दृश्‍यात ट्रेनमध्ये प्रवासात असताना जेड आपल्या जागेवर एका वृद्ध स्त्रीला बसायला देते.

    जेडमध्ये कोणते चांगले गुण तुम्हाला दिसून आले?

  • ‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा-प्रश्‍न विचारून’ या व्हिडिओतल्या एका दृश्‍यात निता हात पुढे करून जेडला आपली ओळख करून देत आहे.

    जेडची ओळख करून घ्यायला निताने काय केलं?

  • ‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा-प्रश्‍न विचारून’ या व्हिडिओतल्या एका दृश्‍यात जेड निताने विचारलेल्या प्रश्‍नाचं उत्तर देत आहे.

    आनंदाच्या बातमीबद्दल जेडची उत्सुकता वाढावायला निताने कोणता प्रश्‍न विचारला?

  • ‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा-प्रश्‍न विचारून’ या व्हिडिओतल्या एका दृश्‍यात निता वचन वाचल्यानंतर जेडला एक प्रश्‍न विचारते.

    निताने कशा प्रकारे प्रश्‍न विचारून जेडला विचार करायला लावला?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा