“ख्रिस्ताचं प्रेम आम्हाला भाग पाडतं”—२कर ५:१४
ख्रिस्ती जीवन
तुम्ही मार्च किंवा एप्रिल महिन्यात सहायक पायनियर म्हणून सेवा कराल का?
स्मारकविधीच्या काळात, तुम्हाला यहोवाच्या सेवेत आणखी जास्त करायची इच्छा आहे का? (२कर ५:१४, १५) मार्च किंवा एप्रिल महिन्यात, तुम्ही ३० किंवा ५० तास करून सहायक पायनियर सेवा करू शकता. जर तुम्हाला स्मारकविधीच्या खास मोहिमेत भाग घेणं शक्य असेल तर त्यासाठी लागणारा अर्ज तुम्ही भरू शकता. आणि मंडळीच्या सेवा समितीला देऊ शकता. पायनियर सेवा करणाऱ्या भाऊबहिणींची नावं मंडळीत जाहीर केली जातील. त्यामुळे मंडळीतले प्रचारक, या पायनियर भाऊबहिणींना सेवाकार्यात मदत करू शकतील. या स्मारकविधीच्या काळात सेवाकार्यात जास्तीत जास्त भाग घेतल्यामुळे आपल्याला प्रचारातली कौशल्य वाढवता येतील आणि एकमेकांना प्रोत्साहन देता येईल. तर चला, आपण या संधीचा पूर्ण फायदा घेऊ या!—१थेस्स ५:११.