१४-२० डिसेंबर
लेवीय १२-१३
गीत ५५ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“कुष्ठरोगासाठी दिलेल्या नियमांतून आपण काय शिकू शकतो?”: (१० मि.)
लेवी १३:४, ५—कुष्ठरोग झालेल्या लोकांना वेगळं ठेवलं जायचं (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती-HI१८ क्र. १ पृ. ७)
लेवी १३:४५, ४६—इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून कुष्ठरोग्यांनी लोकांपासून दूर राहायचं होतं (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६ क्र. ३ पृ. ९ परि. १)
लेवी १३:५२, ५७—संसर्ग झालेल्या वस्तूंना जाळून टाकायचं होतं (इन्साइट-२ पृ. २३८ परि. ३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
लेवी १२:२, ५—प्रसूतीनंतर एका स्त्रीला “अशुद्ध” का समजलं जात होतं? (टेहळणी बुरूज०४ ५/१५ पृ. २३ परि. १)
लेवी १२:३—आठव्या दिवशी मुलाची सुंता करण्याची आज्ञा यहोवाने का दिली होती? (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती-HI१८ क्र. १ पृ. ७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लेवी १३:९-२८ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. मग श्रोत्यांना विचारा: प्रचारकाने प्रभावीपणे प्रश्नांचा वापर कशा प्रकारे केला? वचन कसं लागू करायचं हे त्याने कशा प्रकारे स्पष्ट केलं?
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास १९)
पुनर्भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आनंदाची बातमी हे माहितीपत्रक दाखवा आणि पाठ ११ मधून बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे अभ्यास ९)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) आनंदी कुटुंब भाग ५
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत ३९ आणि प्रार्थना