देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम ३७-३८
निवासमंडपातल्या वेदी आणि खऱ्या उपासनेत त्यांची भूमिका
निवासमंडपातल्या वेदी यहोवाच्या सूचनांनुसार बनवण्यात आल्या होत्या आणि त्यांचं एक खास महत्त्व होतं.
सुगंधी द्रव्ययुक्त धूपाप्रमाणे, यहोवाच्या सेवकांच्या प्रार्थना त्याचं मन आनंदित करतात.
यहोवा होमबलीच्या वेदीवर दिले जाणारे अर्पण स्वीकारायचा. होमबलीची वेदी देवाची “इच्छा”, म्हणजे त्याच्या एकुलत्या एका मुलाचं बलिदान स्वीकार करण्याच्या त्याच्या इच्छेला सूचित करायची. ही वेदी पवित्र स्थानाच्या अगदी समोर असायची. त्यामुळे, एक व्यक्ती बलिदान अर्पण करायला यायची तेव्हा सर्वात आधी तिला ही वेदी दिसायची. यावरून आपल्याला हे समजतं की आपल्याला जर यहोवाची स्वीकृती मिळवायची असेल तर सर्वात आधी आपल्याला येशूच्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवावा लागेल.—इब्री १०:५-१०; योह ३:१६-१८
आपल्या प्रार्थना देवासमोर धूपाप्रमाणे असाव्यात यासाठी आपण काय करु शकतो?—स्तो १४१:२