ख्रिस्ती जीवन
सेवाकार्यातली आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—कॅमेऱ्यातून किंवा इंटरकॉमवरून साक्षकार्य करणं
हे का महत्त्वाचं: तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे आणि गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे आजकाल सिक्युरिटी कॅमरे आणि इंटरकॉम फोन सर्वसामान्य झाले आहेत. पण या माध्यमाद्वारे साक्षकार्य करताना कदाचित आपल्याला थोडी भीती वाटू शकते, कारण आपण ज्या व्यक्तीशी बोलत असतो, ती आपल्याला पाहू शकते, पण आपण तिला पाहू शकत नाही. पुढे दिलेल्या सूचना आपल्याला कॅमेऱ्यातून किंवा इंटरकॉमवरून साक्षकार्य करताना आत्मविश्वासाने बोलायला मदत करतील.
हे कसं कराल:
सकारात्मक मनोवृत्ती ठेवा. ज्यांच्याकडे सिक्युरिटी कॅमरे किंवा इंटरकॉम असतात, असे बरेच घरमालक आपल्याशी बोलायला तयार असतात
काही कॅमरे, तुम्ही घराची बेल वाजवायच्या आधीच रेकॉर्डिंग करायला सुरुवात करतात, हे आठवणीत असू द्या. त्यामुळे, तुम्ही घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश करताच घरमालक तुम्हाला पाहू किंवा ऐकू शकतो
घरमालक उत्तर देतो, तेव्हा इंटरकॉमवर किंवा कॅमऱ्यात पाहून बोलताना, तुम्ही प्रत्यक्ष त्याच्याशी बोलत असल्यासारखं बोला. तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि तुमचे हातवारे स्वाभाविक असले पाहिजेत. घरमालकाने स्वतः दार उघडल्यावर तुम्ही जे बोलण्याची तयारी केली होती, तेच बोला. कॅमेऱ्यात बोलत असाल, तर चेहरा कॅमेऱ्याच्या खूप जवळ नेऊ नका. घरमालकाने इंटरकॉमवर स्वतः उत्तर दिलं नाही, तर त्यांच्यासाठी मेसेज सोडून जायची गरज नाही
घरमालकाशी तुमचं बोलणं संपल्यावर, कदाचित तो अजूनही तुम्हाला पाहत असेल किंवा ऐकत असेल हे लक्षात असू द्या