२२-२८ जून
निर्गम १-३
गीत २३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“मला जे व्हायचं आहे, ते मी होईन”: (१० मि.)
[निर्गम पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
निर्ग ३:१३—यहोवाच्या नावाचा काय अर्थ होतो आणि तो कशा प्रकारची व्यक्ती आहे, हे मोशेला जाणून घ्यायचं होतं (टेहळणी बुरूज१३ ३/१५ पृ. २५ परि. ४)
निर्ग ३:१४—आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी जे काही बनण्याची गरज आहे ते यहोवा बनतो (राज किताब पृ. ४३ वरील चौकट)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
निर्ग २:१०—फारोच्या मुलीने मोशेला दत्तक घेतलं असावं असं आपण का म्हणू शकतो? (अवेक!०४ ४/८ पृ. ६ परि. ५)
निर्ग ३:१—इथ्रो कशा प्रकारचा याजक होता? (टेहळणी बुरूज०४ ३/१५ पृ. २४ परि. ४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग २:११-२५ (शिकवणे अभ्यास ११)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि तुमच्या भागात सहसा घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास १६)
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि मग घरमालकाच्या आवडीच्या विषयाशी संबंधित असलेलं अलीकडचं एखादं मासिक द्या. (शिकवणे अभ्यास १२)
भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज०२ ६/१५ पृ. १० परि. ६-पृ. ११ परि. ३—विषय: इजिप्तमधल्या संपत्तीपेक्षा मोठी संपत्ती (शिकवणे अभ्यास १३)
ख्रिस्ती जीवन
यहोवाचे मित्र बना—यहोवाचं नाव: (६ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. मग शक्य असेल तर काही मुलांना स्टेजवर बोलवा आणि त्यांना विचारा: यहोवाच्या नावाचा काय अर्थ आहे? यहोवाने काय-काय बनवलं आहे? यहोवा तुम्हाला कशी मदत करू शकतो?
स्कॅन्डिनेव्हियात देवाच्या नावाचा गौरव केला जातो: (९ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. आणि मग श्रोत्यांना विचारा: १६ व्या शतकाआधी बऱ्याच लोकांना देवाचं नाव का माहीत नव्हतं? स्कॅन्डिनेव्हियात यहोवाच्या नावाचा वापर कसा सुरू झाला? न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स हे भाषांतर तुम्हाला का आवडतं?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या! पाठ ४७-४९
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत २ आणि प्रार्थना