ख्रिस्ती जीवन
योसेफसारखं बना—अनैतिकतेपासून पळ काढा
जर कोणी आपल्याला लैंगिक अनैतिकतेच्या मोहात पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर याबाबतीत योसेफचं खूप चांगलं उदाहरण आपल्यासमोर आहे. प्रत्येक वेळेस त्याच्या मालकाची पत्नी त्याला मोहात पाडायचा प्रयत्न करायची, पण तो त्यासाठी कधीच तयार झाला नाही. (उत्प ३९:७-१०) उलट, ‘एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसं करू?’ असं तो तिला म्हणाला. यावरून कळतं, की विवाहात एकमेकांना विश्वासू राहण्याबद्दल यहोवाचा जो दृष्टिकोन आहे, त्यावर त्याने आधीच विचार केला होता. पुढे जेव्हा खूपच गंभीर परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा तिथेच थांबून त्या स्त्रीला मोहात पाडण्याची संधी देण्याऐवजी, तो तिथून पळून गेला.—उत्प ३९:१२; १कर ६:१८.
अनैतिकतेपासून पळ काढा हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
जीनला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो?
मी-क्याँग जेव्हा जीनला तिच्या घरी येऊन, अभ्यासात मदत करण्याविषयी विचारते, तेव्हा तो स्वतःला कोणता महत्त्वाचा प्रश्न विचारतो?
मी-क्याँगने केलेल्या विनंतीचा जीनवर कसा परिणाम होतो?
जीनला मदत कशी मिळते?
अनैतिकतेपासून पळ काढण्यासाठी जीन काय करतो?
या व्हिडिओतून तुम्हाला कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या?