देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति २४
इसहाकसाठी एक पत्नी शोधणं
इसहाकसाठी पत्नी शोधताना अब्राहामच्या सेवकाने यहोवाचं मार्गदर्शन घेतलं. (उत्प २४:४२-४४) आपणही जीवनातले महत्त्वाचे निर्णय घेताना यहोवाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आपण हे कसं करू शकतो?
यहोवाला प्रार्थना करण्याद्वारे
बायबल आणि ख्रिस्ती साहित्यांमधून मदत घेण्याद्वारे
आध्यात्मिक दृष्टिकोन असलेल्या प्रौढ ख्रिश्चनांकडून मदत घेण्याद्वारे