वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 मार्च पृ. ८
  • कोणाकोणाला आमंत्रण द्यायचं?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कोणाकोणाला आमंत्रण द्यायचं?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही स्मारकविधीची तयारी करत आहात का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • स्मारकविधीच्या आमंत्रण पत्रिकांची वाटप मोहीम—मार्च १७!
    आमची राज्य सेवा—२०१२
  • स्मारकविधीची आमंत्रणपत्रिका जगभरात दिली जाईल!
    आमची राज्य सेवा—२०१०
  • आस्था दाखविलेल्या सर्वांना मदत करणे
    आमची राज्य सेवा—१९९३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 मार्च पृ. ८
किचनमध्ये डायनिंग टेबलवर बसून एक बांधव साक्षीदार नसलेल्या आपल्या नातेवाइकाला स्मारकविधीचं आमंत्रण देत आहे. आणि मागे त्यांच्या बायका गप्पा मारत स्वयंपाक करत आहेत.

ख्रिस्ती जीवन

कोणाकोणाला आमंत्रण द्यायचं?

आपल्या भागातल्या अनोळखी लोकांनी आपल्यासोबत स्मारकविधीला उपस्थित राहावं, म्हणून दरवर्षी त्यांना आमंत्रण देण्यासाठी आपण खूप मेहनत घेत असतो. पण त्यासोबतच आपण आपल्या ओळखीच्या लोकांनाही या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं पाहिजे. कारण ओळखीचे लोक असतील तर त्यांची कार्यक्रमाला येण्याची जास्त शक्यता असते. (इयरबुक०८ पृ. ११ परि. ३; पृ. १४ परि. १) मग असे कोणते ओळखीचे लोक आहेत, ज्यांना तुम्ही या कार्यक्रमाचं आमंत्रण देऊ शकता?

  • नातेवाईक

  • सहकर्मचारी किंवा वर्गसोबती

  • शेजारी

  • तुमच्या पुनर्भेटी आणि तुमचे पूर्वीचे व सध्याचे बायबल विद्यार्थी

यासोबतच, मंडळीतले वडील अक्रियाशील प्रचारकांना आमंत्रण देतील. पण तुमच्या ओळखीची एखादी व्यक्‍ती जर तुमच्या भागात राहत नसेल तर काय? असं असेल तर त्या व्यक्‍तीला जवळ पडेल अशा ठिकाणी होणाऱ्‍या स्मारकविधीच्या कार्यक्रमाचं ठिकाण आणि वेळ तुम्हाला शोधता येईल. त्यासाठी तुम्ही jw.org वेबसाईटवर, वरच्या बाजूला दिलेल्या ‘आमच्याविषयी’ या टॅबवर क्लिक करून, “स्मारकविधी” असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता. या वर्षीच्या स्मारकविधीसाठी तयारी करताना, कोणा-कोणाला आमंत्रण देता येईल याचा विचार करा आणि त्यांना या कार्यक्रमाचं आमंत्रण द्या.

कोलाज: १. एक बांधव सुट्टीच्या वेळेत सहकर्मचाऱ्‍याला साक्ष देत आहे. २. एक बांधव रेस्टॉरंटमधल्या एका कर्मचाऱ्‍याला व्हिडिओ दाखवत आहे.
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा