ख्रिस्ती जीवन
तुम्ही तुमचा विश्वास स्पष्ट करू शकता का?
तुम्ही निर्मितीवर विश्वास का ठेवता, असं जर एखाद्याने तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय उत्तर द्याल? आत्मविश्वासाने उत्तर देण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी करणं गरजेचं आहे. पहिली ही, की सर्वकाही देवानेच निर्माण केलं आहे याची खातरी आधी स्वतःला करून द्या. (रोम १२:१, २) आणि दुसरी ही, की आपला विश्वास इतरांना कसा स्पष्ट करता येईल यावर विचार करा.—नीत १५:२८.
निर्मितीवर विश्वास ठेवण्यासाठी इतरांकडे कोणती कारणं आहेत, हे जाणून घेण्यासाठी एक अस्थिरोग तज्ज्ञ तिच्या विश्वासाबद्दल सांगते आणि एक प्राणी शास्त्रज्ञ आपल्या विश्वासाबद्दल सांगतात, हे व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
इरेन हॉफ लॉरेन्सो उत्क्रांतीऐवजी निर्मितीवर विश्वास का ठेवतात?
यारोस्लाव्ह दोव्हेनिच उत्क्रांतीऐवजी निर्मितीवर विश्वास का ठेवतात?
तुमचा निर्मितीवर विश्वास का आहे हे तुम्ही एखाद्याला कसं सांगाल?
देवानेच सर्व गोष्टींची निर्मिती केली आहे याची खातरी स्वतःला आणि इतरांना करून देण्यासाठी, संघटनेने तुम्हाला तुमच्या भाषेत कोणती साधनं उपलब्ध करून दिली आहेत?