देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रकटीकरण २०-२२
“पाहा! मी सर्व काही नवे करत आहे”
२१:१-५
यहोवा सर्व गोष्टी नवीन करण्याचं वचन देतो.
“नवे आकाश”: पृथ्वीवर देवाच्या मूळ उद्देशानुसार असलेली परिस्थिती आणणारं एक नवीन सरकार
“नवी पृथ्वी”: देवाच्या अधिकाराच्या अधीन असणाऱ्या आणि त्याच्या नीतिमान दर्जांनुसार जीवन जगणाऱ्या लोकांचा समाज
“सर्व काही नवे”: गतकाळातल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक दुःखांच्या आठवणी पुसट होत जातील आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या आनंददायक आठवणी त्यांची जागा घेतील