देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | इब्री लोकांना १२-१३
शिस्त लावणं—यहोवाच्या प्रेमाचा पुरावा
शिस्त लावण्यात शिक्षा देणं, सुधारणूक करणं, सूचना देणं आणि शिकवणं या गोष्टी सामील आहेत. जसा एक प्रेमळ पिता आपल्या मुलांना शिस्त लावतो तसा यहोवासुद्धा आपल्याला शिस्त लावतो. यहोवा आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी शिस्त लावतो. जसं की,
आपण बायबल वाचन करतो, व्यक्तिगत अभ्यास करतो, सभांना जातो आणि मनन करतो तेव्हा
भाऊ-बहीण सल्ला देतात किंवा आपली चूक सुधारतात तेव्हा
आपल्या चुकांचा परिणाम आपल्याला भोगू देतो तेव्हा
आपल्याला मंडळीत ताडन दिलं जातं किंवा बहिष्कृत केलं जातं तेव्हा
छळातून किंवा संकटातून जाऊ देतो तेव्हा—टेहळणी बुरूज१५ ९/१५ पृ. २१ परि. १३; इन्साइट-१ पृ. ६२९