देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | १ थेस्सलनीकाकर १-५
एकमेकांना प्रोत्साहन देत राहा आणि एकमेकांची उन्नती करत राहा
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती, इतरांना नक्कीच प्रोत्साहन देऊ शकते. उदाहरणार्थ, आजारपणात किंवा इतर कठीण परिस्थितींमध्ये ‘खूप संघर्ष करावा लागत असला तरीही,’ आपण नियमितपणे सभांना उपस्थित राहण्याद्वारे आणि सेवाकार्यात सहभाग घेण्याद्वारे इतर बंधुभगिनींना प्रोत्साहन देत असतो. (१थेस २:२, तळटीप) तसंच, आधीच विचार करून आणि थोडं संशोधन करून प्रोत्साहनाची गरज असणाऱ्या आपल्या बंधुभगिनींचं आपण सांत्वन करू शकतो.
एखाद्या विशिष्ट समस्येला तोंड देणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्हाला कुठून माहिती मिळू शकते?
तुम्ही मंडळीत कोणाला प्रोत्साहन द्यायचं ठरवलं आहे?