वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 जून पृ. ७
  • विचार करून मनोरंजन निवडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विचार करून मनोरंजन निवडा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या दृष्टीने चांगलं मनोरंजन निवडा
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • हितकारक मनोरंजन कसे निवडावे
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • तुम्हाला मिळू शकते हितावह करमणूक
    सावध राहा!—१९९७
  • सामाजिक मनोरंजन—त्याचे लाभ मिळवा, पाश टाळा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 जून पृ. ७

ख्रिस्ती जीवन

विचार करून मनोरंजन निवडा

आपण विचार करून मनोरंजनाची निवड का केली पाहिजे? कारण आपण जेव्हा एखादा चित्रपट पाहण्याची, गाणं ऐकण्याची, वेबसाईट पाहण्याची, पुस्तक वाचण्याची किंवा एखादा व्हिडिओ गेम खेळण्याची निवड करतो, तेव्हा खरंतर आपण त्या गोष्टींनी आपलं मन भरत असतो. त्यामुळे आपण जी निवड करत असतो त्याचा परिणाम आपल्या वागण्या-बोलण्यावर होतो. पण दुःखाची गोष्ट म्हणजे सध्या जे मनोरंजन उपलब्ध आहे त्यात यहोवाला वीट आणणाऱ्‍या गोष्टींचं प्रमाण जास्त आहे. (स्तो ११:५; गल ५:१९-२१) याच कारणामुळे बायबल आपल्याला अशा गोष्टींची निवड करण्याचं उत्तेजन देतं ज्यामुळे यहोवाचा गौरव होईल.—फिलि ४:८.

मी कोणत्या प्रकारचं मनोरंजन निवडलं पाहिजे?  हा व्हिडिओ दाखवा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • रोममधले क्रूर खेळ

    प्राचीन रोममधल्या खेळांमध्ये आणि आजच्या मनोरंजनात कोणता सारखेपणा आहे?

  • एक पायनियर बांधव मंडळीतल्या एका तरुण बांधवासोबत प्रचार करत असताना

    मनोरंजनाची विचारपूर्वक निवड करण्यासाठी मंडळीतले बंधूभगिनी तरुणांना कशी मदत करू शकतात?

  • एक सैनिक

    मनोरंजनाच्या बाबतीत रोमकर १२:९ मधला सल्ला आपण कसा लागू करू शकतो?

  • काही तरुण साक्षीदार सॉकर खेळताना

    तुमच्या भागात योग्य मनोरंजनासाठी कोणते काही पर्याय उपलब्ध आहेत?

स्वतःहून मनोरंजन करणं किंवा इतरांना ते करताना पाहणं?

‘स्वतःहून काही करण्याऐवजी दुसऱ्‍यांना काहीतरी करताना पाहा,’ असं बऱ्‍याच प्रसिद्ध मालिकांमधून सांगितलं जातं. चित्रपट, पुस्तकं आणि टिव्ही कार्यक्रम यांमधून आपल्याला स्वतःच्या नाही तर समोरच्या व्यक्‍तीच्या कल्पनांचा आनंद लुटता येतो. इतरांना काही करताना पाहणं चुकीचं नसलं तरी अनेकांना स्वतःहून काही केल्यामुळे फायदा झाला आहे. उदाहरणार्थ, काहींना गाणी गायला आवडतात किंवा चित्र काढायला आवडतं. काहींना मैदानी खेळ खेळायला आवडतात किंवा बाहेर फिरायला आवडतं. आपण कोणत्याही प्रकारचं मनोरंजन निवडलं तरी ते नेहमी “देवाच्या गौरवासाठी” असलं पाहिजे.—१कर १०:३१.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा