ख्रिस्ती जीवन
व्यक्तिगत अभ्यासातून जास्तीतजास्त फायदा मिळवा
हे का महत्त्वाचं आहे: देवाच्या वचनाच्या व्यक्तिगत अभ्यासामुळे आपल्याला सत्याची “रुंदी, लांबी, उंची व खोली पूर्णपणे समजून” घ्यायला मदत होते. (इफि ३:१८) यासोबतच, या दुष्ट जगात कोणत्याही दोषापासून दूर राहण्यासाठी आणि “जीवनाचे वचन अगदी घट्ट धरून” ठेवण्यासाठी आपल्याला व्यक्तिगत अभ्यासामुळे मदत होते. (फिलि २:१५, १६) व्यक्तिगत अभ्यासासाठी आपण आपल्या गरजेनुसार साहित्य निवडू शकतो. पण बायबल वाचन आणि अभ्यास करण्यात आपण जो वेळ खर्च करत आहोत, त्याचा जास्तीतजास्त फायदा आपण कसा घेऊ शकतो?
हे कसं करता येईल:
व्यक्तिगत अभ्यासासाठी पेपर किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तुम्ही जे बायबल वापरता, त्यामध्ये महत्त्वाची वाटणारी वचनं तुम्ही ठळक करू शकता आणि त्यावर टिपणी करू शकता
बायबल वाचन करताना, ‘कोण? काय? कधी? कुठं? का? आणि कसं?’ हे प्रश्न स्वतःला विचारा
संशोधनासाठी असलेल्या साधनांचा वापर करून वाचत असलेल्या विषयाबद्दल किंवा वचनाबद्दल इतर माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा
एखादी माहिती आपल्याला कशी लागू होते हे समजून घेण्यासाठी तुम्ही जे वाचत आहात त्यावर मनन करा
तुम्ही जे काही शिकता ते आपल्या दररोजच्या जीवनात लागू करण्याचा प्रयत्न करा.—लूक ६:४७, ४८
परिणामकारक व्यक्तिगत अभ्यासाद्वारे “जीवनाचे वचन घट्ट धरून ठेवा” हा व्हिडिओ पाहून खालील प्रश्नांची उत्तरं द्या:
व्यक्तिगत अभ्यासाबद्दल काही जणांचं काय मत आहे?
व्यक्तिगत अभ्यासाची सुरुवात करण्याआधी प्रार्थना करणं का महत्त्वाचं आहे?
बायबलचा एखादा भाग समजून घेण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होऊ शकते?
बायबल अभ्यास करताना कोण-कोणत्या गोष्टी ठळक करता येतील?
देवाच्या वचनाचा अभ्यास करताना मनन करणं का महत्त्वाचं आहे?
व्यक्तिगत अभ्यासात शिकायला मिळालेल्या गोष्टींचा आपण कशा प्रकारे वापर करू शकतो?
“तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करतो.”—स्तो ११९:९७