देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | २ करिंथकर ११-१३
पौलच्या शरीरातला एक काटा
बायबलमध्ये काही शब्द बऱ्याच वेळा लाक्षणिक अर्थानं वापरण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, काटा हा शब्द अशा लोकांना किंवा गोष्टींना सूचित करण्यासाठी वापरण्यात आला आहे, ज्यांच्यामुळे दुखापत किंवा त्रास होऊ शकतो. (गण ३३:५५; नीत २२:५; यहे २८:२४) पौलने जेव्हा आपल्या शरीरातल्या काट्याचा उल्लेख केला, तेव्हा तो कदाचित खोट्या प्रेषितांबद्दल आणि अशा लोकांबद्दल बोलत असावा ज्यांनी त्याच्या कार्यांची निंदा केली व तो प्रेषित नसल्याचा दावा केला. खाली दिलेल्या वचनांतून पौलच्या शरीरातल्या काट्याचे आणखीन कोणते अर्थ होऊ शकतात?
कोणती गोष्ट तुमच्यासाठी शरीरातला एक काटा आहे?
समस्येत टिकून राहण्यासाठी तुम्ही यहोवावर विसंबून कसं राहू शकता?