वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 जून पृ. २
  • ख्रिस्ताचं जवळून अनुकरण करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ताचं जवळून अनुकरण करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • छळ होत असतानाही आनंदी राहा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • दुःख सहन करणे आपल्याकरता लाभदायक ठरू शकते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • छळ झाला तरी धीर सोडू नका!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • यहोवा आपल्याला धीर धरायला कशी मदत करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 जून पृ. २

ख्रिस्ती जीवन

ख्रिस्ताचं जवळून अनुकरण करा

आपण येशूच्या उदाहरणाचं जवळून अनुकरण केलं पाहिजे. खासकरून, आपल्याला परीक्षांचा आणि छळाचा सामना करावा लागतो तेव्हा. (१पेत्र २:२१-२३) येशूचा जरी अपमान करण्यात आला आणि त्याला दुःखाचा सामना करावा लागला तरीही त्याने कधीच सूड घेतला नाही. (मार्क १५:२९-३२) त्याला कशामुळे धीर धरायला मदत झाली? यहोवाची इच्छा पूर्ण करण्याचा पक्का निर्धार केल्यामुळे त्याला मदत झाली. (योह ६:३८) “जो आनंद त्याच्यासमोर होता” त्यावर त्याने लक्ष केंद्रित केलं.—इब्री १२:२.

आपल्या विश्‍वासामुळे आपला छळ होतो तेव्हा आपली प्रतिक्रिया काय असते? खरे ख्रिस्ती “वाइटाबद्दल कोणाचे वाईट” करत नाहीत. (रोम १२:१४, १७) ख्रिस्ताप्रमाणेच आपणही जेव्हा धीराने दुःखाचा सामना करतो तेव्हा आपण आनंदी होतो कारण आपल्याला माहीत असतं की आपल्याला देवाची स्वीकृती आहे.—मत्त ५:१०-१२; १पेत्र ४:१२-१४.

यहोवाचं नाव सर्वात महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ पाहा आणि त्यानंतर खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • सिस्टर पोएटझिंगर यांनी एकांत कारावासात असताना आपल्या वेळेचा सदुपयोग कसा केला?

  • वेगवेगळ्या छळ छावण्यांमध्ये असताना पोएटझिंगर जोडप्याला काय सहन करावं लागलं?

  • धीराने समस्यांचा सामना करायला त्यांना कशामुळे मदत मिळाली?

नाझी कारावासात असणाऱ्‍या स्त्रिया कष्टाचं काम करताना; ब्रदर आणि सिस्टर पोएटझिंगर

दुःखाचा आणि त्रासाचा सामना करताना ख्रिस्ताच्या उदाहरणाचं जवळून अनुकरण करा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा