ख्रिस्ती जीवन
ख्रिस्ताच्या मागे चालत राहण्यासाठी तुमच्या मुलांना तयार करा
आपली मुलं स्वतःला नाकारून, येशूचा वधस्तंभ उचलून त्याच्या मागे चालत आहेत हे पाहण्यासारखा मोठा आनंद पालकांसाठी दुसरा कोणताच असू शकत नाही. (मार्क ८:३४; ३यो ४) आपल्या मुलांनी येशूच्या मागे चालत राहावं, यहोवाला आपलं जीवन समर्पित करावं आणि बाप्तिस्मा घ्यावा म्हणून पालक त्यांना मदत कशी करू शकतात? बाप्तिस्म्याचं पाऊल उचलायला मुलं तयार आहेत हे कशावरून समजू शकतं?
जा, लोकांना शिष्य करा आणि त्यांना बाप्तिस्मा द्या या पुस्तिकेतल्या पृष्ठं ४-५ वरील “ख्रिस्ती पालकांसाठी दोन शब्द” हा लेख वाचा आणि पुढील प्रश्नांवर चर्चा करा: