देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मार्क ३-४
शब्बाथाच्या दिवशी बरं करणं
यहुदी धार्मिक पुढाऱ्यांचं आचरण पाहून येशूला इतकं दुःख का झालं? कारण त्यांनी कमी महत्त्वाचे असलेले अनेक नियम लादून शब्बाथाला एका ओझ्यासारखं बनवलं होतं. जसं की, शब्बाथाच्या दिवशी पिसवेला मारण्याची मनाई होती. तसंच एखाद्याचा जीव धोक्यात असेल तरच त्याला बरं करणं नियमात बसत होतं. याचा अर्थ, मोडलेलं हाड किंवा मुरगळलेला अवयव शब्बाथाच्या दिवशी बरं करण्याला मनाई होती. यावरून हे स्पष्ट दिसून येतं, की वाळलेल्या हाताच्या माणसाबद्दल धार्मिक पुढाऱ्यांना मुळीच काळजी नव्हती.