डिसेंबर—जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
२५-३१ डिसेंबर
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मलाखी १-४
“तुमचा वैवाहिक नातेसंबंध यहोवाला आनंदित करणारा आहे का?”
(मलाखी २:१३, १४) “तसेच आसवे गाळणे, रडणे व उसासे टाकणे यांनी परमेश्वराच्या वेदीला तुम्ही इतके झाकून टाकले आहे की तो यज्ञार्पणाकडे ढुंकून पाहत नाही; तुमच्या हातून ते आवडीने घेत नाही. तुम्ही म्हणता, असे का? कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीच्यामध्ये परमेश्वर साक्षी आहे; ती तर तुझी सहकारिणी व तुझी कराराची पत्नी असून तिजबरोबर विश्वासघाताने वर्तला आहेस.”
जेहोवाज डे पृ. १२५-१२६ परि. ४-५
यहोवाला आनंद देणाऱ्या कौटुंबिक जीवनाला हातभार लावा
४ इ.स.पू. पाचव्या शतकात मलाखीच्या दिवसात यहुद्यांमध्ये सर्रासपणे घटस्फोट घेतला जायचा. मलाखीने त्यांना सांगितलं: “तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीच्यामध्ये परमेश्वर साक्षी आहे.” आणि तू “तिजबरोबर विश्वासघाताने वर्तला आहेस.” पतींच्या अशा विश्वासघातकी वागण्यामुळे विश्वासघात झालेल्या पत्नींच्या अश्रूंनी म्हणजे “रडणे व उसासे” यांनी यहोवाची वेदी झाकून टाकली होती. आणि दुष्ट याजक या क्रूरतेकडे दुर्लक्ष करायचे.—मलाखी २:१३, १४.
५ मलाखीच्या दिवसांत, विवाहाविषयी अशा वाईट दृष्टिकोनाबद्दल यहोवाचं काय मत होतं? मलाखी लिहितो: “परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, ‘मला सूटपत्राचा तिटकारा आहे.’” त्याने अशी खात्री दिली, की यहोवा बदललेला नाही. (मलाखी २:१६; ३:६) तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली का? यहोवाने याआधीही घटस्फोटाबद्दल तिटकारा आहे असं सांगितलं होतं. (उत्पत्ति २:१८, २४) त्याने मलाखीच्या दिवसातही तसंच केलं. आणि आजही तो असंच करत आहे. काही जण फक्त त्यांच्या विवाह जोडीदारासोबत संतुष्ट नसल्यामुळे घटस्फोट घेण्याचा विचार करतील. हृदय कपटी असलं तरीही यहोवा त्याची पारख करतो. (यिर्मया १७:९, १०) एखादी व्यक्ती कितीही पटवून देण्याचा प्रयत्न करत असली, तरी घटस्फोट घेण्यामागे असलेली लबाडी आणि द्वेषाची भावना यहोवाला माहीत आहे. “आपण ज्याला हिशोब देणार आहोत त्याच्या डोळ्यांपुढे सर्व गोष्टी उघड्या व स्पष्ट आहेत.”—इब्री लोकांना ४:१३.