ख्रिस्ती जीवन
मी साहाय्यक पायनियरिंग करण्याचं नियोजन करू शकतो का?
यहोवाचे सेवक त्याला स्वेच्छेने अर्पणं देतील, हे आपल्याला यहेज्केलने पाहिलेल्या मंदिराच्या दृष्टान्तावरून कळतं. तर आज आपण यहोवाला वैयक्तिक रीत्या स्तुतीचं बलिदान कसं अर्पण करू शकतो?—इब्री १३:१५, १६.
असं करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे, साहाय्यक पायनियर म्हणून सेवा करणं. २०१८ च्या सेवा वर्षात असे बरेच महिने आहेत ज्यांमध्ये पाच शनिवार आणि पाच रविवार येतात. जे पूर्णवेळेची नोकरी करतात आणि सहसा शनिवारी व रविवारी प्रचाराला जातात, अशा बंधुभगिनींना या महिन्यांमध्ये साहाय्यक पायनियरिंग करणं शक्य होईल. त्यासोबतच प्रचारक मार्च आणि एप्रिल महिन्यांत किंवा विभागीय पर्यवेक्षकाची भेट असते त्या महिन्यात, ३० किंवा ५० तास भरून साहाय्यक पायनियरिंग करण्याचं निवडू शकतात.
पण आपल्या परिस्थितीमुळे आपल्याला साहाय्यक पायनियरिंग करणं शक्य नसेल तर? असं असलं तरी आपण आपल्या सेवाकार्याचा दर्जा वाढवण्याचा आणि सेवाकार्यात जास्त वेळ देण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो. तेव्हा आपली परिस्थिती कशीही असो, यहोवावरच्या प्रेमामुळे आपण २०१८ च्या सेवा वर्षात त्याला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू या.—होशे १४:२.
मी सबीना हरनॅनडीससारखा आवेश कसा दाखवू शकतो?
यहोवा माझ्यासोबत असल्यामुळे मला सर्वकाही शक्य आहे, हा व्हिडिओ पाहा आणि पुढील प्रश्नांची उत्तरं द्या:
यहोवाच्या सेवेत जास्त करण्यासाठी सबीनाला कशामुळे उत्तेजन मिळतं?
सबीनाच्या उदाहरणामुळे आपल्याला काय करण्याचं प्रोत्साहन मिळतं?
२०१८ च्या सेवा वर्षादरम्यान तुम्ही कोणकोणत्या महिन्यांत साहाय्यक पायनियर म्हणून सेवा कराल?