वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 जून पृ. ७
  • यहोवाच्या नैतिक स्तरांनुसार जगणं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या नैतिक स्तरांनुसार जगणं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९०
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९८
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२००८
  • यहोवाच्या नावाचा गौरव होईल असा तुमचा पेहराव आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 जून पृ. ७

ख्रिस्ती जीवन

यहोवाच्या नैतिक स्तरांनुसार जगणं

यहोवा देवाने मानवांसाठी नैतिक स्तर ठरवले आहेत. उदाहरणार्थ, देवाचा नियम आहे, की स्त्री आणि पुरुष जेव्हा लग्न करतात तेव्हा त्यांचं नातं अतूट असलं पाहिजे. (मत्त १९:४-६, ९) तो सर्व प्रकारच्या अनैतिक लैंगिक कृत्यांचा द्वेष करतो. (१कर ६:९, १०) तसंच, आपला पेहराव आणि केशभूषा कशी असावी याबाबतीतही त्याने आपल्याला काही तत्त्वं दिली आहेत. यामुळे आपल्याला जगापासून वेगळं दिसायला मदत होते.—अनु २२:५; १ती २:९, १०.

आज बरेच जण देवाच्या स्तरांनुसार वागत नाहीत. (रोम १:१८-३२) त्यांचा पेहराव, केशभूषा आणि आचरण जगातल्या प्रसिद्ध लोकांच्या मतांनुसार असतं. अनेक जण ते करत असलेल्या गंभीर पापांबद्दल बढाई मारतात आणि जे त्यांच्या स्तरांनुसार जगत नाहीत त्यांची ते निंदाही करतात.—१पेत्र ४:३, ४. 

यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण देवाच्या नैतिक स्तरांना पाठिंबा दिला पाहिजे. यासाठी धैर्याची गरज आहे. (रोम १२:९) आपण हे कसं करू शकतो? देवाला जे आवडतं ते आपण इतरांना कुशलतेने सांगितलं पाहिजे. पण त्यासोबतच, आपण स्वतःसुद्धा उच्च स्तरांनुसार जीवन जगलं पाहिजे. जसं की, पेहराव आणि केशभूषा यांबाबतीत आपण स्वतःला असे प्रश्‍न विचारू शकतो: ‘माझी निवड यहोवाच्या स्तरांनुसार आहे की जगाच्या स्तरांनुसार? माझ्या निवडीवरून मी देवाचं भय मानणारी ख्रिस्ती व्यक्‍ती आहे, हे दिसून येतं का?’ तसंच, एखादा कार्यक्रम, चित्रपट निवडताना आपण स्वतःला असे प्रश्‍न विचारू शकतो: ‘हा कार्यक्रम यहोवाला मान्य आहे का? हा कार्यक्रम कोणाच्या नैतिक स्तरांचं समर्थन करतो? मी ज्या प्रकारचं मनोरंजन निवडतो, त्यामुळे अनैतिक गोष्टींचा प्रतिकार करणं मला कठीण जाऊ शकतं का? (स्तो १०१:३) या मनोरंजनामुळे कुटुंबातल्या सदस्यांना किंवा इतरांना अडखळण होईल का?’—१कर १०:३१-३३.

यहोवाने ठरवलेल्या नैतिक स्तरांनुसार जगणं इतकं का महत्त्वाचं आहे? येशू ख्रिस्त लवकरच वाईट लोकांचा आणि दुष्टपणाचा नाश करणार आहे. (यहे ९:४-७) पण जे देवाच्या इच्छेनुसार वागतात त्यांचा मात्र बचाव होईल. (१यो २:१५-१७) तेव्हा, देवाच्या उच्च नैतिक स्तरांनुसार जगण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे इतर जण देवाचा गौरव करतील.—१पेत्र २:११, १२.

एक स्त्री कपड्यांची निवड करताना

पेहराव आणि केशभूषा यांबाबतीत माझ्या निवडीवरून माझ्या नैतिक स्तरांबद्दल काय दिसून येतं?

यहोवाचे मित्र बना—एक पुरुष, एक स्त्री हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • यहोवाच्या स्तरांनुसार जगणं सुज्ञपणाचं का आहे?

  • यहोवाच्या नैतिक स्तरांविषयी पालकांनी आपल्या मुलांना लहानपणापासूनच का शिकवलं पाहिजे?

  • देवाच्या चांगुलपणाचा सर्वांना फायदा व्हावा, यासाठी आपण लहानमोठे सगळेच इतरांची कशी मदत करू शकतो?

जर तुम्हाला कोणी असं विचारलं तर तुमचं उत्तर काय असेल. . .

  • “समलैंगिकता याबद्दल तुमचं काय मत आहे?”

  • “समलैंगिकतेबद्दल बायबलमधले विचार संकुचित आहेत!”

  • “समलैंगिक लोक कधीच बदलू शकत नाहीत, कारण ते जन्मतःच तसे असतात.”

(सावध राहा! क्र. ३ २०१६ मध्ये, बायबलमध्ये समलैंगिकतेबद्दल काय सांगितलं आहे? हा लेख आणि सजग होइए! ४/११ पृ. १०-१२ पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा