देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | विलापगीत १-५
वाट पाहत राहण्याच्या मनोवृत्तीमुळे आपल्याला धीर धरण्यास मदत मिळते
तीव्र छळाचा सामना करताना सकारात्मक मनोवृत्ती बाळगून धीर धरण्यास यिर्मयाला कशामुळे मदत मिळाली?
यहोवाचे जे सेवक पश्चात्ताप दाखवतील त्यांना तो विसरणार नाही आणि त्यांना त्यांच्या वाईट परिस्थितीतून बाहेर काढेल, असा भरवसा यिर्मयाने बाळगला
यिर्मया आपल्या “तारुण्यात जू” वाहण्यास शिकला होता. तरुणपणात जेव्हा एक व्यक्ती धीराने विश्वासाच्या परीक्षांचा सामना करते, तेव्हा ती भविष्यात येणाऱ्या समस्यांचा सामना यशस्वी रीतीने करण्यासाठी तयार होते