८-१४ मे
यिर्मया ३५-३८
गीत ३३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“एबद-मलेख—धैर्य आणि दया दाखवण्याच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण”: (१० मि.)
यिर्म ३८:४-६—सिद्कीया लोकांना घाबरला आणि यिर्मयाला जिवे मारण्यासाठी चिखल असलेल्या विहिरीत टाकून देण्याची त्याने विरोधींना अनुमती दिली (इन्साइट-२ पृ. १२२८ परि. ३)
यिर्म ३८:७-१०—एबद-मलेखने धैर्य दाखवलं आणि यिर्मयाला मदत करण्यासाठी ताबडतोब पावलं उचलली (टेहळणी बुरूज१२-E ५/१ पृ. ३१ परि. २-३)
यिर्म ३८:११-१३—एबद-मलेखने दया दाखवली (टेहळणी बुरूज१२-E ५/१ पृ. ३१ परि. ४)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यिर्म ३५:१९—रेखाबवंशातील लोकांना आशीर्वाद का देण्यात आला? (इन्साइट-२ पृ. ७५९)
यिर्म ३७:२१—यहोवाने यिर्मयाची काळजी कशी घेतली आणि या उदाहरणामुळे कठीण परिस्थितीचा सामना करताना आपल्याला प्रोत्साहन कसं मिळतं? (टेहळणी बुरूज९८ १/१५ पृ. १८ परि. १६-१७; टे.बु.९५ ८/१ पृ. ५ परि. ५-६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यिर्म ३६:२७–३७:२
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-32 पत्रिका—पुनर्भेटीसाठी पाया घाला.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-32 पत्रिका—पुनर्भेट करा आणि पुढच्या भेटीसाठी पाया घाला.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) यहोवाची इच्छा पाठ २६
ख्रिस्ती जीवन
“आपल्या राज्य सभागृहांची काळजी घेणे” (१५ मि.) प्रश्न-उत्तराद्वारे चर्चा. हा भाग वडील हाताळतील. आपल्या राज्य सभागृहांची काळजी घेणे हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर, कार्यकारी समितीच्या प्रतिनिधीची थोडक्यात मुलाखत घ्या. (प्रतिनिधी जर तुमच्या मंडळीतला नसेल तर वडील वर्गाच्या संयोजकाची मुलाखत घेतली जाऊ शकते. आणि फक्त एकच मंडळी राज्य सभागृहाचा वापर करत असेल, तर दुरुस्तीचं काम बघणाऱ्या बांधवाची मुलाखत घेतली जाऊ शकते.) अलीकडेच राज्य सभागृहाच्या दुरुस्तीची कोणती कामं करण्यात आली आहेत? समजा एखाद्या बांधवाकडे किंवा बहिणीकडे दुरुस्तीची वेगवेगळी कामं करण्याचं कौशल्य असेल किंवा त्यांना ती शिकून या कामात मदत करण्याची इच्छा असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? परिस्थिती कशीही असली तरी, राज्य सभागृहाची देखरेख करण्यासाठी मंडळीतले सर्व बंधुभगिनी कसा हातभार लावू शकतात?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. २१ परि. १३-२२, पृ. २१६ वरील उजळणी प्रश्न
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत २९ आणि प्रार्थना