देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया ३५-३८
एबद-मलेख—धैर्य आणि दया दाखवण्याच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण
सिद्कीया राजाच्या दरबारात एबद-मलेख एक अधिकारी होता. त्याने यहोवाला आवडणारे गुण दाखवले
सिद्कीया राजाशी यिर्मयाच्या वतीने ताबडतोब बोलण्याचा निर्णय घेण्याद्वारे आणि त्याला विहिरीतून बाहेर काढण्याद्वारे एबद-मलेखने धैर्य दाखवलं
दोरीने वर खेचताना यिर्मयाला इजा होऊ नये म्हणून त्याच्या काखेत ठेवण्यासाठी कापडाच्या चिंध्या देण्याद्वारे एबद-मलेखने दया दाखवली