वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr17 एप्रिल पृ. १-३
  • एप्रिल—जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एप्रिल—जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०१७
  • उपशिर्षक
  • ३-९ एप्रिल
  • देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया १७-२१
  • “यहोवाला तुमच्या विचारसरणीला व आचरणाला आकार देऊ द्या”
  • इन्साइट-२ पृ. ७७६ परि. ४
  • पश्‍चात्ताप
  • १७-२३ एप्रिल
  • देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया २५-२८
  • “यिर्मयासारखं धैर्यवान व्हा”
  • जेरमाया पृ. २१ परि. १३
  • शेवटल्या दिवसांत सेवा करणे
  • आध्यात्मिक रत्नं शोधा
  • जेरमाया पृ. २७ परि. २१
  • शेवटल्या दिवसांत सेवा करणे
  • जेरमाया पृ. १८७-१८८ परि. ११-१२
  • “माझ्याने स्तब्ध राहवत नाही!”
  • २४-३० एप्रिल
  • देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया २९-३१
  • “नवा करार याविषयी यहोवाने भविष्यवाणी केली होती”
  • इन्साइट-१ पृ. ५२४ परि. ३-४
  • करार
  • जेरमाया पृ. १७३-१७४ परि. ११-१२
  • नव्या करारातून तुम्हाला फायदा होऊ शकतो
  • जेरमाया पृ. १७७ परि. १८
  • नव्या करारातून तुम्हाला फायदा होऊ शकतो
  • अवेक! ६/१२ पृ. १४ परि. १-२
  • बायबल—अचूक भविष्यवाणी असलेलं एक पुस्तक, भाग २
  • इतिहासातून काय दिसून येतं:
जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०१७
mwbr17 एप्रिल पृ. १-३

एप्रिल—जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ

३-९ एप्रिल

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया १७-२१

“यहोवाला तुमच्या विचारसरणीला व आचरणाला आकार देऊ द्या”

(यिर्मया १८:५-१०) “तेव्हा परमेश्‍वराचे वचन मला प्राप्त झाले: हे इस्राएलाच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय, असे परमेश्‍वर म्हणतो. हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, कुंभाराच्या हाती माती असते तसे तुम्ही माझ्या हाती आहा एखादे राष्ट्र अथवा राज्य समूळ उपटून नष्ट करेन असे मी एकदा बोललो; तरी पण ज्या राष्ट्रांविरुद्ध हे मी बोललो, ते आपली दुष्टता सोडील तर त्यावर जे अरिष्ट आणण्याचा माझा विचार होता त्याविषयी मला अनुताप होईल. एखाद्या राष्ट्राची अथवा राज्याची लागवण करून ते मी स्थापेन असे मी एकदा बोललो, तरी पण माझ्या दृष्टीने जे वाईट ते करून त्याने माझे वचन पाळले नाही; तर त्याचे मी हित करेन म्हणून बोललो त्याविषयी मला अनुताप होईल.”

इन्साइट-२ पृ. ७७६ परि. ४

पश्‍चात्ताप

एखादा कुंभार कदाचित एक विशिष्ट प्रकारचं भांडं बनवण्यास सुरवात करेल. पण जर भांडं “त्याच्या हाती असताच बिघडून गेले” तर तो त्यापासून वेगळ्या प्रकारचं भांडं बनवेल. (यिर्म १८:३, ४) या उदाहरणावरून यहोवा हे सांगत नव्हता की एखाद्या मानवी कुंभाराप्रमाणे त्याच्या हातून काही बिघडते, याउलट तो हे सांगत होता की मानवांवर त्याचा अधिकार आहे. मानवांच्या प्रतिसादानुसार त्यांच्यासोबतच्या व्यवहारात फेरबदल करण्याचा त्याला अधिकार आहे. तसंच, जेव्हा ते त्याच्या नीतिमत्त्वाला किंवा कृपेला योग्य प्रतिसाद देत नाहीत तेव्हाही त्यानुसार त्यांच्यासोबतच्या आपल्या व्यवहारात फेरबदल करण्याचा त्याला अधिकार आहे. (यश ४५:९; रोम ९:१९-२१ पडताळून पाहा.)

१७-२३ एप्रिल

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया २५-२८

“यिर्मयासारखं धैर्यवान व्हा”

(यिर्मया २६:८, ९) “ती वचने सर्व लोकांना कळवावी म्हणून यिर्मयास परमेश्‍वराने सांगितले होते; ती सर्व त्याने बोलण्याची संपवल्यावर याजकांनी, संदेष्ट्यांनी व सर्व लोकांनी यिर्मयास पकडून म्हटले, तू मेलाच पाहिजेस. हे मंदिर शिलोप्रमाणे होईल व हे नगर उजाड व निर्जन होईल, असा संदेश तू परमेश्‍वराच्या नामाने का दिला? मग सर्व लोक परमेश्‍वराच्या मंदिरात यिर्मयाच्या भोवती जमले.”

(यिर्मया २६:१२, १३) “मग यिर्मया सर्व सरदारांस व सर्व लोकांस म्हणाला, जी संदेशवचने तुम्ही ऐकली ती सर्व या मंदिराविरुद्ध व या नगराविरुद्ध सांगावी म्हणून परमेश्‍वराने मला पाठवले. यास्तव आता तुम्ही आपले मार्ग व आपली कर्मे सुधारा, परमेश्‍वर तुमचा देव याची वाणी तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हावर जे अरिष्ट आणेन असे परमेश्‍वर बोलला त्याविषयी त्यास अनुताप होईल.”

जेरमाया पृ. २१ परि. १३

शेवटल्या दिवसांत सेवा करणे

यहूदामध्ये धार्मिक आणि राजनैतिक वातावरण खूप जोर पकडून होतं. मग अशा परिस्थितीत धार्मिक पुढाऱ्‍यांनी यिर्मयाच्या संदेशाला कसा प्रतिसाद दिला? यिर्मयाच्या पुस्तकात आपण वाचतो, की त्याचं बोलणं संपल्यावर “याजकांनी, संदेष्ट्यांनी व सर्व लोकांनी यिर्मयास पकडून म्हटले, तू मेलाच पाहिजेस.” ते खूप रागात होते आणि असं म्हणत होते: “हा मनुष्य मरणदंडास पात्र आहे.” (यिर्मया २६:८-११ वाचा.) पण, तरी यिर्मयाचे विरोधी त्याच्यावर प्रबळ होऊ शकले नाहीत. यहोवा त्याच्या या संदेष्ट्याचं रक्षण करण्यासाठी त्याच्यासोबत होता. तसंच, यिर्मयादेखील त्याच्या विरोधींना घाबरला नाही; मग ते कितीही भीतीदायक दिसत असले किंवा त्यांची संख्या कितीही असली तरीही. त्याच प्रकारे आपणही घाबरण्याची गरज नाही.

आध्यात्मिक रत्नं शोधा

(यिर्मया २७:२, ३) “परमेश्‍वर मला म्हणाला, तू आपणासाठी बंधने व जू तयार करून आपल्या मानेवर ठेव आणि ती यहूदाचा राजा सिद्‌कीया याजकडे यरुशलेमास जे जासूद आले आहेत त्यांच्या हस्ते अदोमाचा राजा, मवाबाचा राजा, अम्मोन्यांचा राजा, सोराचा राजा आणि सीदोनाचा राजा यांच्याकडे पाठव.”

जेरमाया पृ. २७ परि. २१

शेवटल्या दिवसांत सेवा करणे

असं दिसून येतं की सिद्‌कीयाच्या शासनाच्या सुरवातीच्या काळात अदोम, मवाब, अम्मोन, सोर आणि सीदोन इथल्या राजांचे संदेशवाहक यरुशलेममध्ये आले. कदाचित नबुखद्‌नेस्सरच्या विरोधात जाण्यासाठी सिद्‌कीयालाही आपल्यात सामील करण्याचा त्यांचा उद्देश असावा. पण, सिद्‌कीयाने बॅबिलॉनला शरण जावं असं यिर्मयाने त्याला आर्जवलं. हा संदेश सांगताना यिर्मयाने खांद्यावर जू घेतलं. असं करण्याद्वारे तो हे दाखवत होता की त्या संदेशवाहकांच्या राष्ट्रांनादेखील बॅबिलॉनच्या लोकांची सेवा करावी लागेल. (यिर्म. २७:१-३, १४)

(यिर्मया २८:११) “आणि तो [हनन्या] सर्व लोकांसमक्ष म्हणाला, परमेश्‍वर म्हणतो, याचप्रमाणे बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याचे जू मी पुऱ्‍या दोन वर्षांच्या आत सर्व राष्ट्रांच्या मानेवरून उतरून मोडून टाकेन. मग यिर्मया संदेष्टा आपल्या वाटेने गेला.”

जेरमाया पृ. १८७-१८८ परि. ११-१२

“माझ्याने स्तब्ध राहवत नाही!”

आपण हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की यिर्मया हा धर्मवेडा नव्हता. विरोधींचा सामना करताना त्याने सुज्ञपणा दाखवला. केव्हा माघार घ्यायची हे त्याला माहीत होतं. हनन्याने त्याच्यासोबत काय केलं याचा विचार करा. हनन्या हा खोटा संदेष्टा जेव्हा सर्व लोकांसमोर यहोवाने केलेल्या भविष्यवाणीच्या विरोधात बोलला, तेव्हा तो चुकीचं बोलत आहे असं यिर्मयाने त्याला सांगितलं आणि एका खऱ्‍या संदेष्ट्याला कसं ओळखलं जातं हे समजावून सांगितलं. राष्ट्रे बॅबिलॉनच्या जूच्या खाली दबून जातील हे चित्रित करण्यासाठी यिर्मया एक लाकडी जू खांद्यावर घेऊन जात होता. हनन्याने रागाच्या भरात ते जू मोडून टाकलं. हनन्या आणखी काय करेल याचा काही अंदाज नव्हता. मग अशा परिस्थितीत यिर्मयाने काय केलं? बायबल म्हणतं: “मग यिर्मया संदेष्टा आपल्या वाटेने गेला.” पण नंतर, यहोवाने त्याला सांगितल्यानुसार तो हनन्याकडे परत गेला आणि देव काय करणार आहे हे त्याला सांगितलं. त्याने सांगितलं की यहूदा राष्ट्र बॅबिलॉनच्या बंदिवासात जाईल आणि हनन्याचा मृत्यू होईल.—यिर्म. २८:१-१७.

बायबलमधील या अहवालावरून हे स्पष्टपणे दिसून येतं की प्रचारकार्य करताना आपण फक्‍त धैर्यच नाही तर सुज्ञपणा दाखवतो. जर घरमालकाला शास्त्रवचनांत दिलेल्या गोष्टी पटत नसतील आणि तो रागावला आणि आपल्याला इजा करण्याचीही त्याने धमकी दिली तर आपण नम्रपणे तिथून निघून दुसरीकडे जाऊन प्रचार करू शकतो. राज्याचा आनंदाचा संदेश सांगताना आपल्याला कोणाशीही वाद घालण्याची गरज नाही. “इतरांनी . . . वाईट केले, तरी स्वतःवर नियंत्रण” ठेवण्याद्वारे आपण त्या घरमालकाशी दुसऱ्‍या एखाद्या योग्य वेळी बोलण्याची संधी खुली ठेवतो.—२ तीमथ्य २:२३-२५ वाचा; नीति. १७:१४.

२४-३० एप्रिल

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया २९-३१

“नवा करार याविषयी यहोवाने भविष्यवाणी केली होती”

(यिर्मया ३१:३१) “परमेश्‍वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करेन.”

इन्साइट-१ पृ. ५२४ परि. ३-४

करार

नवा करार. यहोवाने यिर्मया संदेष्ट्याद्वारे इ.स.पू. सातव्या शतकात नव्या कराराविषयी भविष्यवाणी केली होती. त्याने सांगितलं होतं की इस्राएली लोकांनी जो नियमशास्त्राचा करार मोडला, त्या करारापेक्षा हा करार वेगळा असणार होता. (यिर्म ३१:३१-३४) येशू ख्रिस्ताने आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री, म्हणजे ३३ सालच्या निसान १४ रोजी प्रभूच्या सांजभोजनाच्या विधीची स्थापना केली. त्या वेळी येशूने नव्या कराराविषयी घोषणा केली आणि सांगितलं की हा नवा करार त्याच्या बलिदानाने अंमलात येईल.—लूक २२:२०.

(यिर्मया ३१:३२, ३३) “परमेश्‍वर म्हणतो मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांस मिसर देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार व्हावयाचा नाही; मी त्यांजबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडला. तर परमेश्‍वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करेन तो हा: मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवेन; मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.”

जेरमाया पृ. १७३-१७४ परि. ११-१२

नव्या करारातून तुम्हाला फायदा होऊ शकतो

नव्या कराराच्या आणखी काही वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? नव्या करारात आणि मोशेद्वारे देण्यात आलेल्या नियमशास्त्राच्या करारात असलेला सर्वात मोठा फरक म्हणजे ज्यांवर तो लिहिण्यात आला. (यिर्मया ३१:३३ वाचा.) नियमशास्त्राच्या करारातील दहा आज्ञा दगडी पाट्यांवर लिहिण्यात आल्या होत्या आणि काही काळाने त्या राहिल्या नाहीत. याच्या अगदी उलट यिर्मया संदेष्ट्याने सांगितलं होतं की नव्या करारातील नियम हे मानवांच्या हृदयावर लिहिण्यात येणार होते आणि ते कायम राहणार होते.

(यिर्मया ३१:३४) “परमेश्‍वर म्हणतो, यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्‍यास, कोणी आपल्या बंधूस, परमेश्‍वराला ओळखा, असा बोध करणार नाहीत; कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील; मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही.”

जेरमाया पृ. १७७ परि. १८

नव्या करारातून तुम्हाला फायदा होऊ शकतो

नवा करार, पापी लोकांसोबतच्या यहोवाच्या व्यवहारातील एका खास पैलूवर प्रकाश टाकतो. या लोकांमध्ये ज्यांच्यासोबत नवा करार करण्यात आला आहे त्या अभिषिक्‍तांचा, तसंच पृथ्वीवर राहण्याची आशा असलेल्यांचा समावेश होतो. यहोवाच्या व्यवहाराचा तो खास पैलू म्हणजे, यहोवा जेव्हा आपल्या पापांची क्षमा करतो तेव्हा ते तो पुन्हा आठवणीत आणत नाही हा भरवसा आपण बाळगू शकतो.

(यिर्मया २९:१०) “परमेश्‍वर असे म्हणतो की बाबेलची सत्तर वर्षे भरल्यावर मी तुमचा समाचार घेईन व तुम्हास या स्थळी परत आणण्याचे जे माझे सुवचन आहे ते तुमच्यासंबंधाने पूर्ण करेन.”

अवेक! ६/१२ पृ. १४ परि. १-२

बायबल—अचूक भविष्यवाणी असलेलं एक पुस्तक, भाग २

पूर्णता: इ.स.पू. ६०७ ते ५३७ च्या ७० वर्षांच्या बंदिवासानंतर, पारसचा राजा कोरेश याने बंदिवासात असलेल्या यहूदी लोकांना मुक्‍त केलं. त्याने त्यांना यरुशलेमच्या मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी त्यांच्या देशात परत जाण्याची परवानगी दिली.—एज्रा १:२-४.

इतिहासातून काय दिसून येतं:

बायबलमध्ये भविष्यवाणी केल्यानुसार इस्राएली लोक ७० वर्षांसाठी बॅबिलॉनच्या बंदिवासात राहिले का? इफ्राइम स्टर्न या इस्राएलच्या पुरातत्व शास्त्रज्ञाने काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या. तो लिहितो: “इ.स.पू. ६०७ ते इ.स.पू. ५३८ दरम्यान इस्राएल राष्ट्रात कोणतंही काम किंवा उद्योग करण्यात आला नाही. बॅबिलोनी लोकांनी नाश केलेलं एकही शहर त्या काळादरम्यान पुन्हा उभारण्यात आलं नाही.” त्याने जे म्हटलं त्यावरून हेच दिसून येतं की इ.स.पू. ६०७ ते ५३८ दरम्यान इस्राएली लोक बॅबिलोनच्या बंदिवासात होते.—२ इतिहास ३६:२०, २१.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा