वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 एप्रिल पृ. २
  • त्यांचं मनापासून स्वागत करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्यांचं मनापासून स्वागत करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • स्मारक विधीसाठी त्यांचे स्वागत आहे असे त्यांना वाटू द्या
    आमची राज्य सेवा—१९९४
  • एक जबरदस्त साक्ष दिली जाईल
    आमची राज्य सेवा—२०११
  • आस्था दाखविलेल्या सर्वांना मदत करणे
    आमची राज्य सेवा—१९९३
  • पाहुण्यांचं स्वागत करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 एप्रिल पृ. २

ख्रिस्ती जीवन

त्यांचं मनापासून स्वागत करा

पण नेमकं कोणाचं? आपल्या ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणाऱ्‍या सर्वांचंच आपण मनापासून स्वागत केलं पाहिजे; मग ते पहिल्यांदाच आपल्या सभांना आलेले असोत किंवा मग बऱ्‍याच वर्षांपासून. (रोम १५:७; इब्री १३:२) पुढील परिस्थितीचा विचार करा: समजा इतर देशांतून काही बंधुभगिनी आपल्या मंडळीला भेट देण्यासाठी आले आहेत किंवा मग अक्रियाशील झालेली एखादी ख्रिस्ती व्यक्‍ती बऱ्‍याच वर्षांनंतर सभांना उपस्थित राहिली आहे. मग अशा वेळी जर कोणी त्यांचं मनापासून स्वागत केलं तर त्यांना कसं वाटेल? समजा तुम्ही त्यांच्या ठिकाणी असता तर तुम्हीही नक्कीच याची मनापासून कदर केली असती. (मत्त ७:१२) तर मग, राज्य सभागृहात येणाऱ्‍या नवीन लोकांना सभेच्या आधी आणि नंतर भेटण्यासाठी थोडी जास्त मेहनत घेण्याची तुमची तयारी आहे का? आपण असं केलं तर मंडळीत एक प्रेमळ आणि मैत्रिपूर्ण वातावरण निर्माण होण्यासाठी मदत होते. तसंच, यामुळे यहोवाच्या नावाचाही आदर होतो. (मत्त ५:१६) हे खरं आहे, की प्रत्येक व्यक्‍तीशी बोलणं आपल्याला शक्य होणार नाही. पण आपण जर मेहनत घेतली, तर सर्वांना मंडळीत आल्यावर आपलंसं वाटेल.a

आपण फक्‍त स्मारकविधीसारख्या खास प्रसंगांदरम्यानच मनापासून पाहुणचार दाखवत नाही, तर प्रत्येक वेळी दाखवतो. जेव्हा नवीन लोक आपल्यामध्ये असलेलं ख्रिस्ती प्रेम पाहतात आणि अनुभवतात, तेव्हा तेसुद्धा देवाची स्तुती करण्यासाठी आणि आपल्यासोबत त्याची शुद्ध उपासना करण्यासाठी प्रेरित होतात.—योह १३:३५.

a पण समजा बहिष्कृत करण्यात आलेले किंवा ज्यांनी स्वतःहून मंडळीशी आपलं नातं तोडलं आहे ते सभेत आले तर काय? बायबलमधील तत्त्वं हे स्पष्टपणे दाखवून देतात की अशांसोबत आपण बोलण्याचं टाळलं पाहिजे.—१कर ५:११; २यो १०.

एक बांधव नवीन लोकांचं राज्य सभागृहात स्वागत करताना

नवीन लोकांना मदत करण्यासाठी काही सल्ले

  • स्वतःची ओळख करून द्या आणि त्यांचं नाव विचारा

  • त्यांच्यासोबत बसा

  • आपलं बायबल आणि गीत पुस्तक त्यांना दाखवा

  • सभेनंतर त्यांचे काही प्रश्‍न असतील तर त्यांना उत्तरं देण्यासाठी वेळ काढा

  • संधी मिळाल्यास त्यांना बायबल अभ्यासाविषयी सांगा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा