एका प्रेमळ देवाकडून तुम्हाला कायम टिकणारे आशीर्वाद मिळू शकतात
जगात युद्ध, अत्याचार आणि हिंसा नसती तर किती बरं झालं असतं!
जीवनात आजारपण, दुःख आणि मरण नसतं तर जीवन किती सुंदर असतं!
आपल्याला कुठल्याही गोष्टीची काळजी किंवा चिंता नसती तर आपण किती सुखी असतो!
नैसर्गिक आपत्ती घडल्या नसत्या तर किती चांगलं झालं असतं!
आपल्या या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत. आपल्या सृष्टिकर्त्याने, म्हणजेच आपल्या प्रेमळ देवाने सर्व मानवांना कायम टिकणारं शांतिपूर्ण आणि आनंदी जीवन देण्याचं वचन दिलं आहे.
या अंकांत आपण पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत:
आपल्या सृष्टिकर्त्याचं आपल्यावर प्रेम आहे का?
देवाने आपल्यासाठी कोणता संदेश लिहून ठेवला आहे?
देव आपल्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी करतो आणि पुढेही ज्या करणार आहे, त्यांबद्दल देवाचा संदेश सांगणाऱ्यांनी काय म्हटलं?
आज आणि भविष्यात आनंदी राहायला देव आपल्याला कशी मदत करेल?
आपल्या सृष्टिकर्त्याने आपल्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी बनवल्या आहेत. त्यांवरून आपल्यावर त्याचं किती प्रेम आहे हे दिसून येतं. त्याने बनवलेल्या काही गोष्टींबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू या.